झेड सेक्टरमध्ये गोळीबाराची प्रात्यक्षिके
By Admin | Updated: July 14, 2017 00:10 IST2017-07-14T00:07:02+5:302017-07-14T00:10:14+5:30
नाशिक : देवळाली आर्टिलरी स्कूलमार्फत झेड सेक्टरमध्ये शुक्रवारी (दि.२८) सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके होणार आहेत.

झेड सेक्टरमध्ये गोळीबाराची प्रात्यक्षिके
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : देवळाली आर्टिलरी स्कूलमार्फत झेड सेक्टरमध्ये शुक्रवारी (दि.२८) सकाळी ६ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गोळीबाराची प्रात्यक्षिके होणार आहेत.
या दिवशी धोक्याच्या पातळीत येत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द, अधरवड, बेळगाव तऱ्हाळे, सोनांशी, आडसर खुर्द, वारशिंगवणे, तळवाडी, समनेरे, घोटी खुर्द, लहान घोटीची वाडी, नांदूर वैद्य, टाकेद बुद्रुक, धामणगाव, नांदगाव बुद्रुक, साकूर दुमला, बेळगाव कुऱ्हे, मालुंजे, गंभीरवाडी, भरविर खुर्द, लहवित, अस्वली या गावांनी खबरदारी घ्यावी, असे अपर जिल्हा दंडाधिकारी नाशिक यांनी कळविले आहे.
सदर दिवशी धोक्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करणे, राहणे, स्वत:ची जनावरे जाऊ देणे व ठेवणे हे प्रकार करू नयेत, असेही कळविण्यात आले आहे.