विनयनगर रिक्षासह अॅक्टिवाची जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 15:54 IST2018-10-13T15:50:33+5:302018-10-13T15:54:23+5:30
नाशिक : पार्किंगमध्ये लावलेली रिक्षा व अॅक्टिवा दुचाकी एका संशयिताने आग लावून पेटवून दिल्याची घटना विनयनगरजवळील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़१२) रात्रीच्या सुमारास घडली़ अतुल कोसनकर असे आग लावणाऱ्या संशयिताचे नाव आहे़

विनयनगर रिक्षासह अॅक्टिवाची जाळपोळ
नाशिक : पार्किंगमध्ये लावलेली रिक्षा व अॅक्टिवा दुचाकी एका संशयिताने आग लावून पेटवून दिल्याची घटना विनयनगरजवळील श्रीरामनगरमध्ये शुक्रवारी (दि़१२) रात्रीच्या सुमारास घडली़ अतुल कोसनकर असे आग लावणाऱ्या संशयिताचे नाव आहे़
मनीष जाधव (रा़ श्रीपाद इन्क्लेव्ह, श्रीरामनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री एक वाजेच्या सुमारास संशयित अतुल कोसनकर याने पार्किंगमध्ये लावलेली रिक्षा (एमएच १५, झेड ८५५७) व अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, एफजे २५३२) यांना आग लावून पेटवून दिली़ यामध्ये दोन्ही वाहनांचे ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे़
या प्रकरणी संशयित कोसनकर विरोधात मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़