फटाक्याने आग लागून स्विफ्ट कार खाक सौंदाणे : विवाह सोहळ्यानंतरची आतषबाजी नडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 00:16 IST2018-05-05T00:16:10+5:302018-05-05T00:16:10+5:30
उमराणे : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील शुभमंगल लॉन्सवर लग्न लागल्यानंतर फोडलेल्या फटाक्यांची ठिणगी शेजारीच असलेल्या शेतात पडून लागलेल्या आगीत एक स्विफ्ट कार जळून खाक झाली.

फटाक्याने आग लागून स्विफ्ट कार खाक सौंदाणे : विवाह सोहळ्यानंतरची आतषबाजी नडली
उमराणे : सौंदाणे (ता. मालेगाव) येथील शुभमंगल लॉन्सवर लग्न लागल्यानंतर फोडलेल्या फटाक्यांची ठिणगी शेजारीच असलेल्या शेतात पडून लागलेल्या आगीत एक स्विफ्ट कार जळून खाक झाली, तर काही मोटारसायकलींचेही नुकसान झाले आहे. याबाबत माहिती अशी की, उमराणे येथील धनंजय देवरे यांचा विवाह सौंदाणे येथील शुभमंगल लॉन्सवर आयोजित केला होता. मंगलाष्टके संपताच फटाके फोडण्यात आले, परंतु या फोडलेल्या फटाक्यांची ठिणगी शेजारीच असलेल्या गहू कापलेल्या शेतात पडल्याने व आजूबाजूला कचरा असल्याने मोठी आग लागली. या आगीत लग्नासाठी आलेल्या एका वºहाडीची झाडाखाली लावलेली (एमएच ४१ व्ही २४०१) ही स्विफ्ट कार जळून खाक झाली असून, शेजारी लावलेल्या काही मोटारसायकलींनाही या आगीच्या झळा लागल्याने नुकसान झाले आहे.