घोटीत पेट्रोलपंपाच्या टाकीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:40 IST2018-05-27T00:40:38+5:302018-05-27T00:40:38+5:30

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर घोटीजवळील इंडियन आॅइल पेट्रोलपंपाच्या पेट्रोल टाकीला शनिवारी सकाळी आग लागली.

Firecrackers of a ghoti petrol pump | घोटीत पेट्रोलपंपाच्या टाकीला आग

घोटीत पेट्रोलपंपाच्या टाकीला आग

ठळक मुद्देआगीवर नियंत्रण मिळविण्यात यशशॉर्टसर्किट झाल्याने पेट्रोलने पेट घेतल्याने आग

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर घोटीजवळील इंडियन आॅइल पेट्रोलपंपाच्या पेट्रोल टाकीला शनिवारी सकाळी आग लागली.
तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. घोटी येथील नटराज पेट्रोलपंपाच्या वीस हजार लिटर क्षमतेच्या
भूमिगत पेट्रोल टाकीचे स्वच्छतेचे काम करत असताना टाकीच्या तळाशी असलेले पेट्रोल काढत असताना टाकीजवळून गेलेल्या वीजवाहिनीत शॉर्टसर्किट झाल्याने पेट्रोलने पेट घेतल्याने आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले. पंपावरील कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला व घोटी टोल नाका आणि इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणेला कळविण्यात आले. अग्निशमन यंत्रणेने त्वरित येऊन आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती घोटी पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह उपनिरीक्षक विलास घिसाडी, आनंदा माळी, कर्मचारी धर्मराज पारधी, सुहास गोसावी आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Firecrackers of a ghoti petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग