साताळी येथे शेती साहित्याला आग, दीड लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:56 IST2021-03-31T23:20:21+5:302021-04-01T00:56:10+5:30
येवला : तालुक्यातील साताळी येथे विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

साताळी येथे शेती साहित्याला आग, दीड लाखांचे नुकसान
ठळक मुद्देदहा पोते गहूसह इतर साहित्य भस्मसात झाले.
येवला : तालुक्यातील साताळी येथे विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
साताळी येथे चारी नंबर ३४ जवळ राहणार्या अशोक सूर्यभान कोकाटे यांच्या घराजवळील शेती साहित्य शेडला मंगळवारी, (दि. ३०) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत तुषार, ठिबक संच सेट व दहा पोते गहूसह इतर साहित्य भस्मसात झाले.
दरम्यान, परिसरातील शेतकर्यांनी आग विझवण्यासाठी मदत केली तर नगरपरिषदेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी पोहोचला होता. (३१ येवला १)