पंचवटी आगारातील स्टोअर रूमला आग

By Admin | Updated: April 25, 2017 19:00 IST2017-04-25T19:00:28+5:302017-04-25T19:00:28+5:30

पंचवटी आगारातील स्टोअर रूमला आग

Fire in Panchavati fire room store room | पंचवटी आगारातील स्टोअर रूमला आग

पंचवटी आगारातील स्टोअर रूमला आग

पंचवटी : जुना आडगाव नाक्यावरील पंचवटी बस आगारातील स्टोअर रूमला सकाळी सात वाजता आग लागून रूममधील कागदपत्रे जळाल्याची घटना घडली. पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
याबाबत माहिती अशी की, जुना आडगाव नाक्यावर शहर बससेवेचे पंचवटी आगार असून, सकाळी सात वाजता स्टोअर रूममधून धूर व आगीचे लोळ बाहेर येत असल्याचे काही बसवाहक व चालकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती कळविली. घटनेनंतर पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ पंचवटी बस आगारात धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या आगीत प्रवाशांचे जुने पास व अन्य कागदपत्रे काही प्रमाणात जळाले. (वार्ताहर)

Web Title: Fire in Panchavati fire room store room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.