इंदिरानगर येथे मजुरांच्या घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 18:43 IST2021-04-08T18:42:56+5:302021-04-08T18:43:30+5:30
वणी - वणी -मुळाणा रस्त्यावरील इंदिरानगर येथे मजुरांच्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.

इंदिरानगर येथे मजुरांच्या घराला आग
वणी - वणी -मुळाणा रस्त्यावरील इंदिरानगर येथे मजुरांच्या घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
राजुबाई केदु गवळी या कुटुंबीयांसमवेत इंदिरानगर येथे वास्तव्यास आहेत. घरातील सदस्य मोलमजुरी करण्यासाठी बाहेर गेले होते तर कुटुंबातील लहान मुले घरालगतच्या परिसरात खेळत होती. गुरूवारी (दि.८) दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने भितीने बाहेरील भागातील मुले पळाली.
परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळाली .घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेतली मात्र आगीने रौद्र स्वरुप धारण केले होते. त्यामुळे काही वेळेतच घराची राखरांगोळी झाली. दरम्यान आरिफ शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांना सुरक्षित स्थळी नेले व आग विझविण्यासाठी प्रयत्न केले .ग्रामपालिका प्रशासनाने पाण्याचे क्टर पाठविले मात्र तोपर्यंत सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. सदर कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
फोटो- ०८ इंदिरानगर फायर
वणी-मुळाणा रस्त्यावरील इंदिरानगर येथे लागलेल्या आगीत जळून खाक झालेले घर.