आग लागून झोपडी खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:22 IST2020-02-17T23:01:27+5:302020-02-18T00:22:04+5:30

मालेगाव तालुक्यातील सावतावाडी येथे इंदिरानगर भागात आग लागल्याने चंद्रकला अभिमन माळी यांची झोपडी जळून खाक झाली.

Fire hut | आग लागून झोपडी खाक

आग लागून झोपडी खाक

वडनेर : मालेगाव तालुक्यातील सावतावाडी येथे इंदिरानगर भागात आग लागल्याने चंद्रकला अभिमन माळी यांची झोपडी जळून खाक झाली. सोमवारी (दि.१७) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रकृती बरी नसल्याने उपचारासाठी चंद्रकला माळी या दवाखान्यात गेल्या होत्या. परिसरातील मजूर शेतावर कामास गेले असल्याने दुपारी कुणीही नव्हते. तसेच शेजारील पांडुरंग बारकर यांच्या घराला मागील बाजूस आग लागली लागल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी परिसरात धाव घेऊन आग विझविली. तलाठी गायके यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. संसारोपयोगी वस्तू जळून सुमारे चंद्रकला माळी यांचे १ लाख १५ हजार रु पयांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Fire hut

टॅग्स :fireआग