गॅरेजचा कचरा पेटविल्याने आगीचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 01:18 IST2021-03-29T01:18:25+5:302021-03-29T01:18:47+5:30
शहर व परिसरात कचरा पेटविण्यास मनाई असतानासुध्दा सर्रासपणे मनपा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत मदिना चौकाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या वळणावर गॅरेजमधील नादुरुस्त वाहनांच्या कुशन्सचा कचरा अशाप्रकारे भर उन्हात वारंवार पेटवून दिला जातो.

गॅरेजचा कचरा पेटविल्याने आगीचा धोका
नाशिक : शहर व परिसरात कचरा पेटविण्यास मनाई असतानासुध्दा सर्रासपणे मनपा प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत मदिना चौकाकडे जाणाऱ्या महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या वळणावर गॅरेजमधील नादुरुस्त वाहनांच्या कुशन्सचा कचरा अशाप्रकारे भर उन्हात वारंवार पेटवून दिला जातो. यामुळे येथे आगीची दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
या भिंतीपासून जवळच महावितरणचे विद्युत रोहित्र
असल्याने धोका अधिकच
वाढतो, यामुळे प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत
आहे.