शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

मुकणेच्या वनक्षेत्राला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:10 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील मुकणे शिवारात असलेल्या वनकक्ष क्रमांक २२६ मधील डोंगरावरील २६ हेक्टरवर पसरलेल्या वनक्षेत्रात रविवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली.

ठळक मुद्देदीड हेक्टर क्षेत्र बाधित : रोपवन थोडक्यात बचावले

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील मुकणे शिवारात असलेल्या वनकक्ष क्रमांक २२६ मधील डोंगरावरील २६ हेक्टरवर पसरलेल्या वनक्षेत्रात रविवारी (दि.२२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. घटनेची माहिती मिळताच येथील वन तपासणी नाक्यावरील वनरक्षकांसह नाशिक पश्चिम वन विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत पेटलेले गवत विझविले. या आगीत सुमारे दीड हेक्टरचा परिसर बाधित झाला आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मुकणे येथील वनविभागाच्या डोंगरावर काही वर्षांपूर्वी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. सुमारे चार हजार रोपांची लागवड व संवर्धन प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांकडून केले जात आहे. याच डोंगरावर कोणीतरी अज्ञात इसमांनी दुपारच्या सुमारास धूम्रपान करताना अर्धवट जळालेली थोटके किंवा आगकाडी निष्काळजीपणे फेकल्यामुळे वाळलेल्या रानगवताने तत्काळ पेट घेतला. वाºयाचा वेग अधिक असल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली. घटनेची माहिती मिळताच प्रतिष्ठानच्या दहा ते बारा स्वयंसेवकांसह वनपाल मधुकर गोसावी, रोहिणी पाटील, योगेश खैरनार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या वृक्षांच्या काही फांद्या तोडून त्याआधारे पेटलेले गवत विझविण्यास सुरुवात केली. डोंगरावर आग असल्यामुळे आणि घटनास्थळापर्यंत जाण्याची वाटदेखील बिकट असल्याकारणाने अग्निशमन दलाची मदत घेता आली नसल्याचे गोसावी यांनी सांगितले. नैसर्गिक पद्धतीने पेटलेले गवत वनरक्षक व वनमजुरांसह प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी विझवले. सुदैवाने या आगीत रोपवन सुरक्षित राहिले. रोपवनापासून लांब अंतरावर आग असल्यामुळे व वेळीच आग विझविण्याला प्रारंभ झाल्याने रोपांना फारशी झळ बसली नसल्याचा दावा वनविभागाच्या सूत्रांनी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकforestजंगलfireआग