आग आग.. वाचवा वाचवा.. पळापळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:32 IST2019-08-22T23:24:13+5:302019-08-23T00:32:31+5:30
गुरुवारी सकाळी ९ वाजता येथील न्यू इंग्लिश मीडिअम स्कूल आणि समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात एकच धावपळ उडाली... आग.. आग.. वाचवा.. वाचवा.. पळापळा अशी आरडाओरड झाली.. फायर अलार्म वाजू लागले. शिक्षक - विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गाच्या बाहेर काढण्यात आले.

विंचूर येथे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे गिरवताना विद्यार्थी.
विंचूर : गुरुवारी सकाळी ९ वाजता येथील न्यू इंग्लिश मीडिअम स्कूल आणि समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात एकच धावपळ उडाली... आग.. आग.. वाचवा.. वाचवा.. पळापळा अशी आरडाओरड झाली.. फायर अलार्म वाजू लागले.
शिक्षक - विद्यार्थ्यांची पळापळ सुरू झाली. विद्यार्थ्यांना सुरक्षित वर्गाच्या बाहेर काढण्यात आले. सायरन वाजत अॅम्ब्युलन्स आली. जखमी विद्यार्थ्यांवर प्रथमोपचार करण्यात आले तसेच बेशुद्ध अवस्थेतील विद्यार्थ्यांला स्ट्रेचरने अँम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आले व ती वेगाने दवाखान्याकडे रवाना झाली. आग विझवण्यासाठी शिक्षक विद्यार्थी पुढे सरसावले.
फायरच्या साहाय्याने आग विझवण्यात आली... अन् सर्वांनी सुटकेचा नि:स्वास टाकला. हा सर्व थरार येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात अनुभवला तो आपत्ती व्यवस्थापनाच्या अग्निशमन या प्रात्यक्षिकाने विद्यार्थ्यांना भविष्यात आपत्ती व्यवस्थापन करता यावे यासाठी पूर्वनियोजन करून प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्र्रमासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी गणेश अधुरे, प्राचार्या दुर्गा जाधव, शिक्षक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्र मावेळी विद्यार्थ्यांना पाण्यात बुडालेला व्यक्ती किंवा जखमी अवस्थेतील व्यक्तीवर प्रथमोपचार कसा करावा तसेच आग विझवण्याचेही प्रात्याक्षिक करून दाखवले. पूर, भूकंप किंवा आग आदींसारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी त्यांना तयार करणे, परिस्थितीनुरूप कृती करणे, पोलीस स्टेशन, फायरब्रिगेड, दवाखाना आदी महत्त्वाच्या ठिकाणी संपर्क करणे, इतरांची मदत घेणे याचे मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या शंका उपस्थितीत केल्या त्याचेही निरसन करण्यात आले.