शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
6
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
7
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
8
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
9
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
10
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
11
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
12
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
13
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
14
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
15
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
16
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
17
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
18
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
19
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
20
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली

पांडवलेणी डोंगरावर आगीचा भडका; वाऱ्याचा वेग असल्याने पसरली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 14:08 IST

आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे.

ठळक मुद्देतासाभरात आग आटोक्यातआग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होतीएक ते सव्वा हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले

नाशिक :पांडवलेणी डोंगराभोवती असलेल्या राखीव वनात शनिवारी (दि.२८) अचानकपणे सकाळी दहा वाजेच्या सुमारास आगीचा भडका उडाला. या आगीमध्ये साधारणत: एक ते सव्वा हेक्टरवरील वनक्षेत्र बाधित झाले आहे. काही प्रमाणा वाळलेले गवत आणि जास्त वेगाने वाहणारा वारा यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते.

घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे वनमजूर व स्थानिक तरुणांनी धाव घेत झाडाच्या फांद्याच्याअधारे (झोडपणी) आग विझविण्यास सुरुवात केली. तासाभरात आग आटोक्यात आली.पांडवलेणी येथील पंडीत जवाहरलाल नेहरु वनोद्यानापासून डोंगराच्या सभोवताली राखीव वनक्षेत्र आहे. या राखीव वनाच्या २२५ कक्ष क्रमांकामध्ये डोंगराच्या उत्तरेच्या बाजूने गौळाणे रोडच्या दिशेने सकाळी आग भडकली. सुमारे दहा वाजेच्या सुमारास डोंगरावरुन धुराचे लोट व आगीच्या ज्वाला उठत असल्याचे काही नागरिकांच्या नजरेस पडले. यावेळी काही सुज्ञ नागरिकांनी तत्काळ नाशिक पश्चिम वनविभागाला माहिती दिली. तसेच अग्निशमन दलालाही कळविले.

दरम्यान, पांडवलेणी राखीव वनक्षेत्र हे वनविकास महामंडळाच्या अखत्यारितित येत असल्यामुळे पश्चिम नाशिक वनविभागाचे वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी महामंडळाचे वनक्षेत्रपाल प्रवीण डमाळे यांच्याशी तत्काळ संपर्क साधून आगीची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच महामंडळाचे वनपाल दिपक बोरसे, वनमजूर सुदाम जाधव, नरोत्तम कोकणी, मानसिंग गावित, शिवाजी गायकवाड आदिंनी डोंगरावर धाव घेतली. जंगलातील आग विझविण्याची पारंपरिक पध्दतीचा अवलंब करत वनमजूरांनी आग विझविण्यास सुरुवात केली. मात्र सकाळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळविताना वनमजुरांची दमछाक झाली. तासाभरानंतर आग पुर्णपणे विझविण्यास वनमजुरांसह नागरिकांना यश आले. या आगीमध्ये गवत मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले; मात्र झाडांना सुदैवाने कमी हानी पोहचल्याचे डमाळे यांनी सांगितले. दहा वाजेच्या सुमारास डोंगराच्या पायथ्याला सिडको अग्नीशमन उपकेंद्राचा बंब दाखल झाले; मात्र डोंगरावर आग पसरलेली असल्यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांनी पायथ्यालाच थांबून राहिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

--आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. राखीव वनात कोणीही वावरताना आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल केले जाणार आहे. - प्रवीण डमाळे, वनक्षेत्रपाल 

टॅग्स :NashikनाशिकforestजंगलPandav cavesपांडवलेणीAccidentअपघात