पूराच्या पाण्यात रात्री अडकलेल्या कुटुंबाला अग्निशमन दलाने केले ‘रेस्क्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:38 IST2019-08-05T14:36:06+5:302019-08-05T14:38:36+5:30
रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३०), आणि शंकर रतन वाघ (१६) असे तिघेजण पाण्यात अडकले होते

पूराच्या पाण्यात रात्री अडकलेल्या कुटुंबाला अग्निशमन दलाने केले ‘रेस्क्यू’
नाशिक : रविवारी गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे मालेगाव स्टँड उतारावरील गोदापार्कलगत असलेल्या चिंचबनजवळ सुलभ शौचालयाच्या इमारतीला पूराच्या पाण्याचा वेढा पडला होता. या इमारतीवर असलेल्या तीघांना अग्निशमन केंद्राच्या जवानांनी धाव घेऊन सुरक्षितपणे पूराच्या पाण्यातून रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास बाहेर काढले.
रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३०), आणि शंकर रतन वाघ (१६) असे तिघेजण पाण्यात अडकले होते. पुराचे पाणी वाढण्यापूर्वी नागरिकांनी त्यांना बाहेर येण्यास सांगितले होते मात्र त्यानंतर पुराचे पाणी वाढत गेल्याने तिघांना पाण्याबाहेर निघण्याची संधी मिळाली नाही त्यामुळे त्यांनी शौचालयावर असलेल्या खोलीत धाव घेतली व त्या ठिकाणी ते अडकून पडले.
सदर घटना परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी माजी नगरसेवक दिलीप खेडकर यांना कळविली त्यानंतर खेडकर यांनी तत्काळ अिग्नशमन दलाला तिघे जण पाण्यात अडकल्याची माहिती कळविली घटनास्थळी पंचवटी अिग्नशमन दल तसेच अिग्नशमन मुख्यालयातील जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्यात बोट उतरून चिन्मय आश्रम ते शौचालय पर्यंत शंभर मीटर पुराच्या पाण्यात नेऊन शौचालयावर अडकलेल्या शेवरे पती-पत्नी, भाचा वाघ अशा तिघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले. परिसरात वीज पुरवठा खंडित झाला असताना बॅटरी च्या सहाय्याने बोट घटनास्थळापर्यंत नेण्यात आली यावेळी बोटीला लांबलचक दोरखंड बांधण्यात येऊन नागरिकांच्या मदतीने पाण्यातून बोट बाहेर ओढण्यात आली. अग्निशमन दलाचे मंगेश पिंपळे, सिद्धार्थ भालेराव, विजय शिंदे, देविदास इंगळे, आर. आर. पवार, आदि कर्मचाऱ्यांनी तिघांचे प्राण वाचिवले.