शहर बसच्या चाकाला आग; अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:26 IST2019-01-08T00:26:32+5:302019-01-08T00:26:37+5:30
बिटको चौकातील बडोदा बॅँकेजवळ शहर वाहतुकीच्या बसच्या पाठीमागील चाकाच्या लायनरमध्ये अचानक बिघाड झाल्याने आग लागून धूर येऊ लागला. सदर घटना त्या ठिकाणी असलेल्या मनपा कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला.

शहर बसच्या चाकाला आग; अनर्थ टळला
नाशिकरोड : बिटको चौकातील बडोदा बॅँकेजवळ शहर वाहतुकीच्या बसच्या पाठीमागील चाकाच्या लायनरमध्ये अचानक बिघाड झाल्याने आग लागून धूर येऊ लागला. सदर घटना त्या ठिकाणी असलेल्या मनपा कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित अग्निशामक दलाला पाचारण केल्याने पुढील अनर्थ टळला. पंचवटी येथून नाशिकरोड बसस्थानकात येणारी शहर वाहतुकीची बसच्या पाठीमागील चाकाकरिता असलेल्या ब्रेकच्या लायनरमध्ये अचानक बिघाड झाल्याने तेथे आग लागून धूर येऊ लागला. त्या ठिकाणी उभे असलेले मनपा कर्मचारी जनार्दन घंटे, महेंद्र अरिंगळे, सूरज सगर यांना सदर बाब लक्षात येताच त्यांनी त्वरित बस थांबवून अग्निशामक दलाला तातडीने पाचारण केले. त्यानंतर पाणी मारून विझवल्याने अनर्थ टळला.