नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टीतील झोपड्यांना आग; सात गोरगरीब कुटुंबांचा संसार जळून खाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 21:49 IST2018-01-06T20:54:12+5:302018-01-06T21:49:51+5:30
संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून परिसरात अंधार पसरला. क्षणार्धात सात झोपड्यांना आगीने वेढा दिला.

नाशिकमधील गंजमाळ झोपडपट्टीतील झोपड्यांना आग; सात गोरगरीब कुटुंबांचा संसार जळून खाक !
नाशिक : येथील गंजमाळ परिसरातील भीमवाडी झोपडपट्टीत घासबाजाराला लागून असलेल्या झोपड्यांना अचानकपणे लागलेल्या आगीत सहा ते सात कुटुंबांचा संसार जळून खाक झाला. सुदैवाने महिलांनी आपल्या लहान मुलांसह झोपड्यांमधून बाहेर धाव घेतल्यामुळे कुठल्याहीप्रकारे जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे दोन बंब घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा सुमारे पंधरा ते वीस झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असत्या कारण आगीने भीषण रुप धारण केले होते.
जुने नाशिक भागातील भद्रकाली पोलीस ठाण्याला लागून असलेल्या गंजमाळ परिसरात भीमवाडी झोपडपट्टी आहे. या भागात गवतासह भंगार मालाच्या विक्रीची दुकाने आहेत. संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागून परिसरात अंधार पसरला. क्षणार्धात सात झोपड्यांना आगीने वेढा दिला.



