नाशिकमधील गोंदे येथील ए आर एस एस कंपनीस आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 17:16 IST2017-09-06T15:22:53+5:302017-09-06T17:16:00+5:30

इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील एका रसायनाच्या कंपनीला आज दुपारी अकस्मात आग लागली.

Fire at ARS Co., Gonda, Nashik | नाशिकमधील गोंदे येथील ए आर एस एस कंपनीस आग

नाशिकमधील गोंदे येथील ए आर एस एस कंपनीस आग

घोटी, दि. 6 - इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील एका रसायनाच्या कंपनीला आज दुपारी अकस्मात आग लागली. या आगीत रसायनने भरलेल्या टाकीचा स्फोट झाल्याने संपूर्ण कंपनीला आग लागली.

अग्निशामक दलाच्या चार बंबानी अथक प्रयत्नाने ही आग विझविण्याचे काम सुरू होते मात्र यश आले नाही. तीन कामगार बचावले दरम्यान सदरच्या बंद कारखान्याच्या देखभालीसाठी तीन कामगार कंपनीत होते.हे तिन्ही कामगार स्फोट होताच प्रसंगावधान राखून बाहेर पडल्याने बचावले.

Web Title: Fire at ARS Co., Gonda, Nashik