शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजी नागरिकांना दंड करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:34 IST

शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला तर ती परिसरातील घरांमध्येच आढळतात. त्यामुळे नागरिक निष्काळजी असून त्यांच्या विरोधात तातडीने दंडात्मक कारवाई सुरू करा,

नाशिक : शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असून, डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला तर ती परिसरातील घरांमध्येच आढळतात. त्यामुळे नागरिक निष्काळजी असून त्यांच्या विरोधात तातडीने दंडात्मक कारवाई सुरू करा, असे आदेश महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय सहाय्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी यांनी दिले आहेत.  समितीची बैठक बुधवारी (दि.२९) सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी आरोग्याच्या विषयावर वादळी चर्चा झाली. यावेळी सभापतींनी आदेश दिले. त्याचवेळी नागरिकांच्या घरात एका ठिकाणी डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असेल तर पाचशे रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे जीवशास्त्रज्ञ गायकवाड यांनी सांगितले.शहरात जानेवारीपासून आत्तापर्यंत पाचशेच्यावर संशयित डेंग्यू रुग्णांची संख्या गेली असून, चालू महिन्यात ७६ डेंग्यूरुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सभापती सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. आरोग्य विभाग प्रबोधनावर भर देत असला तरी नाशिकची लोकसंख्या वीस लाख असून, एक लाख पत्रकांनी काय होणार असा प्रश्न करीत त्यांनी शहरात होर्डिंग्ज लावण्याबरोबरच अस्वच्छता ठेवणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश दिले. ज्याच्या घरात डेंग्यूचे रुग्ण होतात त्यांच्यावर कठीण प्रसंग येत असतो. मात्र, आसपासच्या रहिवाशांच्या घरातच डेंग्यू डास होत असतात. झोपडपट्टी विभागात हा प्रकार नसून चांगल्या वस्त्यांमध्येच हा प्रकार घडत असल्याने कारवाई करावी, असे आदेश त्यांनी दिले.महापालिकेच्या वतीने घरभेटी देण्याचे काम सुरू असून महिन्याकाठी केवळ ६० हजार घरांनाच भेटी देता येतात, पाच ते साडेपाच लाख घरांना भेटी देण्यासाठी किमान ७६० सुपरवायझर असले पाहिजे, असे सांगून कुलकर्णी यांनी डास निर्मूलनाच्या ठेकादाराकडून महापालिका योग्य पध्दतीने काम करून घेत नाही. त्यामुळे ठेकेदार बदलण्याची सूचना केली.  यावेळी संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे आणि रूची कुंभारकर यांनी, डास निर्मूलनासाठी फवारणी होत नाही, तक्रार करूनही त्या भागात फवारणी करणारे कर्मचारी पोहोचत नाहीत अशा तक्रारी केल्या तसेच ज्या ठिकाणी नागरिक कर्मचाºयांना घरात प्रवेश करू देत नाही त्यांच्यासाठी ओळखपत्र जवळ ठेवून त्यांना त्यांच्याच सुरक्षिततेसाठी घरतपासणी होत असल्याची जाणीव करून द्यावी, अशी सूचना केली. शोभा साबळे यांनी महापालिकेच्या शाळा विशेषत: जुन्या नाशिकमधील शाळांमध्ये अस्वच्छता असल्याची तक्रार केली.त्यावर शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी खुलासा केला.  महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन नसल्याची तक्रार प्रतिभा पवार यांनी केली तर त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांनी महापालिकेच्या चार मोठ्या रुग्णालयांपैकी डॉ. झाकीर हुसेन व सिडकोतील श्री समर्थ रुग्णालयात अद्याप सोनोग्राफी केंद्र नसून सिंहस्थ निधीतून हे काम होत असल्याचे सांगितले. त्यावर सिंहस्थ पार पडूनही अद्याप ही सुविधा मिळत नसल्याने संतोष गायकवाड आणि रूची कुंभारकर यांनी नाराजी व्यक्त केली...तरच डेंग्यू रुग्ण घोषित करामहापालिकेच्या हद्दीतील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना साथरोगांचे रुग्ण कळविण्याची सक्ती करण्यात आली असून प्राथमिक चाचणीत रुग्ण घोषित करू नये, राष्टÑीय विषाणू संशोधन प्रयोग शाळेकडून अधिकृत अहवाल आल्यानंतरच डेंग्यू रुग्ण घोषित करावेत, अशा सूचना देण्यात आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी यांनी सांगितले.डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोधडेंग्यू डासाच्या उत्पत्ती स्थळांच्या शोध मोहिमेअंतर्गत ४७३ बांधकामांच्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. शासकीय इमारती आणि मनपाच्या शाळा इमारती अशा ३१५ मिळकतींची तपासणी करण्यात आली असून २२३ ठिकाणी टायर्स तपासणी तसेच २३३ गोठ्यांची तपासणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य