Finding 4 missing girls in two and a half years | अडीच वर्षांत हरविलेल्या ४१५ बालिकांचा शोध
अडीच वर्षांत हरविलेल्या ४१५ बालिकांचा शोध


नाशिक : फूस लावून पळवून नेणे, मैत्री अथवा प्रेमाचे आमिष दाखवून मागील दोन ते अडीच वर्षांत पळवून नेलेल्या ४६३ अल्पवयीन मुलींपैकी ४१५ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. उर्वरित ४८ मुलींचा अद्याप थांगपत्ता लागला नसून पोलिसांकडू शोध सुरू आहे.
खेळण्याच्या व शिक्षणाच्या वयात मुले-मुली आकर्षणातून पळून जाण्याच्या घटना शहरात घडू लागल्या आहेत. यामध्ये फूस लावून अल्पवयीन बालिकांना पळवून नेल्याचे प्रकार समोर आले आहेत. चालू वर्षात आॅगस्टपर्यंत ११८ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून, यापैकी ९३ घटनांमध्ये मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुली १५ ते १७ या वयोगटांतील असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अल्पवयीन असल्याने त्यांच्या पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांकडून तपासाला गती दिली जाते. बहुतांश मुलींना विविध कारणास्तव अथवा फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या मुलींचा पोलिसांनी तपास करत तब्बल
४१५ प्रकरणांचा उलगडा करण्यास यश मिळविले. मुलींना पळवून नेणाऱ्या संशयितांविरुद्ध कायदेशीर कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.
बहुतांश घटनांमध्ये कौटुंबिक नात्यातील व्यक्तींनीदेखील लहान मुलांचे अपहरण केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत अशाचप्रकारे अपहरण केलेल्या बालिकेची पोलिसांनी अवघ्या काही तासांत सुटका केली होती. या गुन्ह्यात त्या बालिकेच्या नातेवाइकाविरुद्ध पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत अटक केली आहे.
...अशी आहेत अपहरणाची कारणे
पालकांचे मुलांकडे होणारे दुर्लक्ष.
मुलांना जाणवणारी एकाकीपणाची भावना.
टीव्ही मालिकांचा विपरीत परिणाम.
सभोवतालच्या वातावरणाचे आकर्षण.
प्रेम, मैत्रीविषयीच्या भावना.
पौगंडावस्थेत शरीरामध्ये होत जाणारे शारीरिक-मानसिक बदल.
मुलींना विविध कारणास्तव अथवा फूस लावून पळवून नेण्यात आलेल्या मुलींचा पोलिसांनी तपास करत तब्बल ४१५ प्रकरणांचा उलगडा करण्यास यश मिळविले. मुलींना पळवून नेणाºया संशयितांविरुद्ध कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.
अशी आहे मुलींच्या अपहरणाची आकडेवारी
वर्ष : अपहरण उकल
२०१७ : १६३ १५७
२०१८ : १८२ १६५
२०१९ (आॅगस्टपर्यंत) : ११८ ९३

Web Title:  Finding 4 missing girls in two and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.