जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नाड्या आवळणार

By Admin | Updated: April 7, 2017 16:42 IST2017-04-07T16:42:47+5:302017-04-07T16:42:47+5:30

जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणारे वेतन आठवडा उलटत आला तरी झालेले नाहीत.

The financial rolls of the district bank will be implemented | जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नाड्या आवळणार

जिल्हा बॅँकेच्या आर्थिक नाड्या आवळणार

नाशिक : जिल्हा बॅँकेचे धनादेश वटत नसल्याने दर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होणारे वेतन आठवडा उलटत आला तरी झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची बेचैनी वाढली आहे. त्यातच मार्च एण्डला दिलेले धनादेशही वटत नसल्याने जिल्हा परिषदेच्या मक्तेदारांनी लेखा विभागाला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा परिपाक म्हणून सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षांना पाचारण केले आहे.

Web Title: The financial rolls of the district bank will be implemented