विंचूरीदळवी येथील विद्यार्थीनींना सायकलींसाठी अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:36 IST2019-06-25T17:35:44+5:302019-06-25T17:36:26+5:30
सिन्नर - नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते यांच्या सुचनेनुसार १४ व्या वित्त आयोगातून मानव विकास अंतर्गत शालेय विद्यार्थीनींना सायकलींसाठी ग्रामपंचायतीकडून अर्थसाहाय म्हणून ७५ हजार रूपयांची तरतूद करऱ्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर १६ विद्यार्थीनींना सायकलींसाठी अर्थसहाय्य करण्यात आले.

विंचूरीदळवी येथील विद्यार्थीनींना सायकलींसाठी अर्थसहाय्य
ग्रामसभेत २७ विद्यार्थीनींमधून चिठ्ठी काढून १६ विद्यार्थीनींची निवड केली होती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार डीबीटीद्वारे लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी करून पावती सादर केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात ३ हजार ५०० रूपये ग्रामपंचायतीने रेखांकीत धनादेशाने वर्ग केले. शाळा सुरु झाल्यानंतर लगेचच या १६ विद्यार्थीनींनी या सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच संगीता पवार, उपसरपंच भास्कर चंद्रे , ग्रामपंचायत सदस्य जयराम दळवी, शांताराम दळवी, दत्तात्रय शेळके, बहिरु दळवी, निर्मला दळवी, सुनिता भोर, भारती दळवी, विमल दळवी, सविता बर्वे, मुख्याध्यापक बाळासाहेब पांडे, ग्रामविकास अधिकारी संजय गिरी उपस्थित होते.