नाशिक : महापालिका हद्दीतील तीन ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देऊन तीन वर्षे झाले, परंतु हे कामच होत नसल्याच्या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त देताच प्रशासनाने घाईघाईने संबंधित एजन्सीकडून अहवाल मागवून घेतला. अर्थात हा अत्यंत प्राथमिक अहवाल असल्याने यासंदर्भातील स्पष्ट अहवाल तसेच पूल वापरा योग्य आहे किंवा कसे याबाबत पुन्हा अहवाल सादर करण्यास महापालिकेने संबंधितांना सांगितले आहे.मुंबईत अलीकडेच सीएसटीजवळील पादचारी पूल कोसळला. तत्पूर्वी सावित्री नदीवरील पूल कोसळण्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती त्यावेळी राज्य शासनाने सर्व यंत्रणांना आपल्या कार्यक्षेत्रातील जुन्या पुलांचे आॅडिट करण्याचे आदेश दिले होते. नाशिक महापलिकेने त्यासंदर्भात कार्यवाही सुरू केली, मात्र टप्प्याटप्प्यावर फाइल अडत गेली. त्यानंतर महापलिकेने निविदा मागवल्या आणि एका एजन्सीला काम देण्याचे निश्चित केले परंतु गेल्या वर्षी त्यावरदेखील
अखेर ‘त्या’ ब्रिटिश कालीन पुलांचा आॅडिट अहवाल सादर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:46 IST
महापालिका हद्दीतील तीन ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देऊन तीन वर्षे झाले, परंतु हे कामच होत नसल्याच्या प्रकाराबाबत लोकमतने वृत्त देताच प्रशासनाने घाईघाईने संबंधित एजन्सीकडून अहवाल मागवून घेतला.
अखेर ‘त्या’ ब्रिटिश कालीन पुलांचा आॅडिट अहवाल सादर !
ठळक मुद्दे स्ट्रक्चरल आॅडिट : तीन वर्षांनंतर कार्यवाही, काम अर्धवटच