...अखेर ‘टिप्पर’च्या समीरला ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 01:09 IST2021-01-29T01:08:45+5:302021-01-29T01:09:31+5:30

‘टिप्पर’ टोळीचा म्होरक्या समीर पठाण ऊर्फ छोटा पठाण हा मागील काही दिवसांपासून फरार होता. खंडणी वसुली आणि अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांना तो हवा होता. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने त्याचा माग काढत इगतपुरीतून मुसक्या बांधल्या. 

... finally handcuffed Sameer of 'Tipper' | ...अखेर ‘टिप्पर’च्या समीरला ठोकल्या बेड्या

...अखेर ‘टिप्पर’च्या समीरला ठोकल्या बेड्या

नाशिक : ‘टिप्पर’ टोळीचा म्होरक्या समीर पठाण ऊर्फ छोटा पठाण हा मागील काही दिवसांपासून फरार होता. खंडणी वसुली आणि अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांना तो हवा होता. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने त्याचा माग काढत इगतपुरीतून मुसक्या बांधल्या. 
भद्रकाली पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. समीर याने शालिमार येथे फिर्यादीला बोलावून घेत त्याची कार बळजबरीने ताब्यात घेऊन त्या कारचालकाला बेदम मारहाण करत कारमध्ये डांबून मुंबईच्या दिशेने पलायन केले होते. दरम्यान, कारचालकाला घोटी येथे त्याने ढकलून देत कार घेत पोबारा केला होता. यानंतर कारचालकाने भद्रकाली पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली होती. संशयित सराईत गुंड समीर हा शिवसेना प्रणित अवजड वाहतूक सेनेचा पदाधिकारी असल्याचेही बोलले जात आहे.

Web Title: ... finally handcuffed Sameer of 'Tipper'