शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

...अखेर 'त्या' गोळीबार 'नाट्य'वरील पडदा उघडला; कर्जबाजारीतून मार्ग काढण्याचा 'प्रयोग'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:26 PM

कर्जबाजारी झाल्याने स्वप्निलकडे पैशांसाठी लोक तगादा लावत होते. यामधुन सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार केला आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव रचला.

ठळक मुद्देस्वप्नील दंडगव्हाळसह तीघे ताब्यात

नाशिक : मुंबईआग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्दीतील रायगडनगर येथील एका वळणावर गुरुवारी मध्यरात्री नाट्य कलावंत स्वप्नील गायकवाड यांच्यावर दुचाकीने आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दंडगव्हाळ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा पोलिसांनी दाखल केला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असताना या गोळीबार 'नाट्य'वरील पडदा अखेर उघडला. दंडगव्हाळ यांनी स्वत: कर्जबाजारीला कंटाळून त्यामधून मार्ग काढण्यासाठी 'प्रयोग' केल्याचे शनिवारी निष्प्नन्न झाले.याबाबत ग्रामिण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील कॉलेजरोड भागात राहणारे दंडगव्हाळ हे त्यांच्या कामानिमित्त मित्राची ॲसेंट कार (एमएच १५ ईपी १४३४) घेऊन ठाणे येथे गुरुवारी (दि२५) येथे गेले होते. कामकाज आटोपून नाशिककडे परतत असताना त्यांनी जेवणासाठी रायगडनगर येथे वाहन थांबविले. जेवण आटोपून पुन्हा नाशिककडे येत असताना दुचाकीने आलेल्या अज्ञात दोघा हल्लेखोरांनी पिस्तुलमधून त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडल्याची फिर्याद त्यांनी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात दिली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिला वालावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला सखोल तपास करत तातडीने गुन्ह्याचा छडा लावण्याचे आदेश दिले. पोलीस निरिक्षक राजेंद्र कुटे, समीर अहिरराव, अनिल वाघ, नवनाथ गुरुळे, हेमंत गिलबिले, रवींद्र वानखेडे आदिंच्या पथकाने तपासाला गती दिली. संशयावरुन स्वप्नील यांना प्रथम चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

यावेळी घटनाक्रम आणि त्यांनी सांगितलेली हकिगत यामध्ये तफावत आढळून आली. यामुळे पोलीसांचा संशय अधिकच बळावला. स्वप्नील यास पोलिसांनी 'खाक्या'दाखवत कसून चौकशी केली असत, त्याने गुन्ह्याची कबुली देत स्वत: रात्री दीड वाजेच्या सुमाारास कारच्या काचेवर गोळीबार केल्याचे सांगून या नाट्याचा प्रयोग संपविला.---इन्फो---'गोळीबार'मधील सहकलाकारही ताब्यातकर्जबाजारी झाल्याने स्वप्निलकडे पैशांसाठी लोक तगादा लावत होते. यामधुन सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार केला आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव रचला. संशयित स्वप्नील यास या 'गोळीबार' नाट्यात साथ देणारे संशयित केशव संजय पोतदार (२५, रा. सिध्दीविनायक सोसा. इंदिरानगर) व रौनक दीपक हिंगणे (३१, रा. गुरुद्वारा रोड, शिंगाडा तलाव) आणि आसिफ आमिन कादरी (३५, रा. मोठा राजवाडा, जुने नाशिक) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील केशव आणि रौनक यांना घटनास्थळी बोलावून स्वप्नील याने गुन्ह्यात वापरलेले बेकायदेशीर पिस्तुल दिले. तर केशव याने हे पिस्तुल लपविण्यासाठी आसिफकडे दिल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. या तीघांविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना पुढील तपासाकरिता वाडीवऱ्हे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकFiringगोळीबारArrestअटक