शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

अखेर महापालिकेत बाप्पा विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:30 IST

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच देवदेवतांच्या मूर्ती हटविण्याचे दिलेले आदेश, त्यानंतर गणेश उत्सवावरील नियमावलीचे निर्बंध अशा वातावरणामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव यंदा अनिश्चित असताना आयुक्तांनी त्याला परवानगी तर दिलीच, परंतु मेनरोड आणि राजीव गांधी मुख्यालयात दोन्ही ठिकाणी हजेरी लावून पूजा विधीही केल्याने साºयांनाच सुखद धक्का बसला.

ठळक मुद्देसुखद धक्का : तुकाराम मुंढे यांनी केली सपत्निक पूजा

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच देवदेवतांच्या मूर्ती हटविण्याचे दिलेले आदेश, त्यानंतर गणेश उत्सवावरील नियमावलीचे निर्बंध अशा वातावरणामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव यंदा अनिश्चित असताना आयुक्तांनी त्याला परवानगी तर दिलीच, परंतु मेनरोड आणि राजीव गांधी मुख्यालयात दोन्ही ठिकाणी हजेरी लावून पूजा विधीही केल्याने साºयांनाच सुखद धक्का बसला.महापालिकेच्या वतीने पूर्व विभागीय कार्यालय म्हणजेच मेनरोड येथील उत्सव म्हणजे शहराचा मानाचा पहिला गणपती मानला जातो, तर राजीव गांधी मुख्यालयातही सार्वजनिक गणपती अधिकारी कर्मचारी बसवत असतात. तथापि, तुकाराम मुंढे यांनी मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर मुख्यालयातील विविध प्रकारच्या मूर्ती आणि प्रतिमा हटविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले तसेच भालेकर मैदान येथे गणेशोत्सवाला परवानगी नाकारल्याने गणेशोत्सवावर विघ्न आल्याची चर्चा सुरू झाली होती. महापालिकेच्या कर्मचाºयांनादेखील गणेशोत्सव साजरा करता येईल किंवा नाही अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र कार्यालयीन वेळेत आणि नागरी कामकाजाला अडथळा येत नसेल तर उत्सव साजरा करण्यास हकरत नाही अशी भूमिका आयुक्तांनी घेतली होती. त्यानुसार कर्मचारी संघटनेने मंडपासाठी परवानगी मागितल्यानंतर त्यांनी परवानगीदेखील घेतली होती. आयुुक्तांनी परवानगी तर दिलीच, परंतु उत्सवात ते सक्रिय सहभागी झाले होते. पूर्व विभागीय कार्यालय व राजीव गांधी भवन येथे तुकाराम मुंढे यांच्या शुभहस्ते सहपरिवार आरती करून श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.लोकसेवा हीच श्रींची सेवाविघ्नहर्त्या श्री गणेशाचा उत्सव साजरा करीत असताना लोकसेवा हीच ईश्वर सेवा आहे. लोकसेवेच्या वेळेत आरती न करता कार्यालयीन कामच करावे, कामकाज सुरू असताना अन्य कामांसाठी वेळ दिलेला खपवून घेतला जाणार नाही, असे यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगतानाच लोकसेवेचा संकल्प करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेGaneshotsavगणेशोत्सव