अखेर खेड-टाकेद परिसरात आधारकेंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:20 IST2020-12-05T04:20:58+5:302020-12-05T04:20:58+5:30
इगतपुरी तालुक्यातील टाकेद-खेड या जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास ४२ वाड्यावस्त्यांसह २० ते २२ ग्रामपंचायती असून, या परिसरातील नागरिकांना आधार ...

अखेर खेड-टाकेद परिसरात आधारकेंद्र सुरू
इगतपुरी तालुक्यातील टाकेद-खेड या जिल्हा परिषद गटामध्ये जवळपास ४२ वाड्यावस्त्यांसह २० ते २२ ग्रामपंचायती असून, या परिसरातील नागरिकांना आधार कार्ड नोंदणी तसेच शासकीय दाखल्यांचा कामकाजासाठी घोटी, इगतपुरी या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे शालेय विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. येथील नागरिकांना आधार कार्ड कामकाजासाठी वेळ व पैसे खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. आधार कार्ड, नाव, जन्मतारीख, पत्ता दुरुस्ती, आधार अपडेट, आधार लिंक, नवीन कार्ड या कामांसाठी घोटी येथे यावे लागते. तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड ही प्रमुख गरज झाली असल्याने तसेच घोटी येथे आधार कार्ड कामकाजासाठी संपूर्ण दिवस जात असल्याने येथील आदिवासी भाग असलेल्या गरीब व होतकरू नागरिकांना ते परवडणारे नाही. या परिसरात एक आधार नोंदणी केंद्र उभारण्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.
कोट...
‘टाकेद-खेड येथील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नसून नवीन आधार कार्ड, तसेच दुरुस्तीच्या कामासाठी नागरिकांचा वेळ व पैसे खर्च होत होता. आदिवासी भाग असल्यामुळे या परिसरात आधार नोंदणी केंद्रांची मागणी केली असता संबंधित प्रशासनाने दखल घेत आधार केंद्र मंजूर केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
- राम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, टाकेद