शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

करवाढीचा अंतिम निर्णय महासभेतच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 1:03 AM

नाशिक : नाशिककरांना दत्तक घेतल्याची भावनिक घोषणा करणाºया मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद दिल्यानंतर भाजपाने बहुमत मिळवले खरे, परंतु नाशिककरांवर भरघोस करवाढ लादण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. आयुक्तांनी सादर केलेली दरवाढ जशीच्या तशी स्वीकारल्यानंतर भाजपावर चौफेर भडिमार झाला असून, त्यापार्श्वभूमीवर भाजपाने बॅकफुटवर जात करवाढीचा फैसला महासभेतच होईल, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. ...

नाशिक : नाशिककरांना दत्तक घेतल्याची भावनिक घोषणा करणाºया मुख्यमंत्र्यांना प्रतिसाद दिल्यानंतर भाजपाने बहुमत मिळवले खरे, परंतु नाशिककरांवर भरघोस करवाढ लादण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला आहे. आयुक्तांनी सादर केलेली दरवाढ जशीच्या तशी स्वीकारल्यानंतर भाजपावर चौफेर भडिमार झाला असून, त्यापार्श्वभूमीवर भाजपाने बॅकफुटवर जात करवाढीचा फैसला महासभेतच होईल, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर करवाढ ही भाजपाची भूमिकाच नसल्याचे गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी म्हटले आहे. गेल्या २२ वर्षांत शहरात घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ झाली नसल्याचा दावा करीत बुधवारी (दि.१६) स्थायी समितीने आयुक्तांची करवाढीची शिफारस जशीच्या तशी मान्य केली. घरगुती, बिगर घरगुती आणि व्यावसायिक अशा सर्वच प्रकारांत दरवाढ करण्यात आली. त्यानुसार घरपट्टीत सरसकट १८ टक्के वाढ करण्यात आली असून, पाणीपट्टीत चाळीस टक्के वाढ करण्यात आली आहे. सामान्यत: आयुक्तांनी प्रस्ताव दिल्यानंतर त्यात स्थायी समिती कपात करते, परंतु येथे मात्र भाजपाने या करवाढीचे समर्थन तर केलेच, परंतु शशिकांत जाधव यांनी तर करवाढ करावी ही नागरिकांचीच मागणी असल्याचा दावा केला होता. नाशिककरांना भाजपाने दणका दिल्यानंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. नाशिक शहरात सध्या महापालिकेच्या वतीने मिळकतींचे सर्वेक्षण सुरू असून, साठ हजार बेकायदेशीर बांधकामे आढळली आहेत. अशा स्थितीत इतकी घाई कशासाठी असा प्रश्न केला जात आहे. विशेषत: कोणत्याही करवाढीसाठी २० फेब्रुवारीच्या आत निर्णय होणे बंधनकारक आहे आणि आज मितीला त्यासाठी तब्बल सहा महिने अवकाश आहे.