कोरोना काळात वाढदिवसउपसरपंचावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 01:30 IST2021-07-21T00:13:56+5:302021-07-21T01:30:07+5:30

येवला : तालुक्यातील निमगाव मढ येथील उपसरपंचावर जिल्हाधिकारी आदेश उल्लंघन केल्या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Filed a case against the birthday subconscious during the Corona period | कोरोना काळात वाढदिवसउपसरपंचावर गुन्हा दाखल

कोरोना काळात वाढदिवसउपसरपंचावर गुन्हा दाखल

ठळक मुद्देजिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे उल्लंघन

येवला : तालुक्यातील निमगाव मढ येथील उपसरपंचावर जिल्हाधिकारी आदेश उल्लंघन केल्या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

निमगाव मढ येथील विद्यमान उपसरपंच नितीन लभडे यांनी सोमवारी २८ जून रोजी निमगाव मढ येथील मारुती मंदिरासमोर वाढदिवस साजरा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे उल्लंघन करत गैरकायदा मंडळी जमवल्याची तक्रार माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती.

सदर तक्रारीवर जिल्हाधिकारी यांनी माहिती घेऊन येवला तहसीलदारांना लेखी पत्र पाठवले होते. त्यानुसार निमगाव मढ येथील तलाठी तथा आपत्ती व्यवस्थापन समिती स्थानिक अध्यक्ष दत्तात्रय गिरी यांनी तालुका पोलिसात विद्यमान उपसरपंच नितीन लभडे व इतर ६ व्यक्तीं विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Filed a case against the birthday subconscious during the Corona period