शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

नाशिक तहसील कार्यालयातून फाईल गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 4:06 PM

पोलीस अकादमी समोरील सर्व्हे नंबर ७५०, ७५१ व ७५५ या सुमारे ६० एकर जमिनींबाबत चाललेल्या टेनन्सी सरेंडरच्या टेनन्सी केस नंबर ८/२००३ व १०/२००३ या केसेसच्या निकाली फाईली तसेच सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावतीच्या सर्टिफाईड नकला मिळाव्यात यासाठी सदर जमिनीचे पूर्वगामी कुळ दिगंबर त्रिलोकचंद अहिरवार यांनी माहिती कायद्याच्या अधिकारात जनमाहिती

ठळक मुद्देशोधूनही सापडेना : माहिती आयोगाच्या आदेशाला हरताळसर्टिफाईड नक्कल कोर्ट कामासाठी मिळावी यासाठी माहिती मागविली होती.

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्टÑ पोलीस अकादमीसमोरील सुमारे ६० एकर जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहाराची कागदपत्रे नाशिक तहसीलदार कार्यालयातून गहाळ झाल्याची बाब उघडकीस आली असून, यासंदर्भात जागा मालकाने राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाकडे अपील दाखल केले असता, तत्काळ कागदपत्रे देण्याचे आदेश देऊनही तहसील कार्यालयाने त्याची अंमलबजावणी न केल्याने याबाबत आता थेट राज्याच्या मुख्य माहिती आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्टÑ पोलीस अकादमी समोरील सर्व्हे नंबर ७५०, ७५१ व ७५५ या सुमारे ६० एकर जमिनींबाबत चाललेल्या टेनन्सी सरेंडरच्या टेनन्सी केस नंबर ८/२००३ व १०/२००३ या केसेसच्या निकाली फाईली तसेच सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावतीच्या सर्टिफाईड नकला मिळाव्यात यासाठी सदर जमिनीचे पूर्वगामी कुळ दिगंबर त्रिलोकचंद अहिरवार यांनी माहिती कायद्याच्या अधिकारात जनमाहिती अधिकारी तथा कूळ कायदा अव्वल कारकून, तहसील कार्यालय यांच्याकडे सदर केसच्या निर्णयाच्या, जाबजबाबाच्या व कब्जे पावतीच्या नकला मिळणेसाठी दोन अर्ज केले होते. तथापि, सदर केसची फाईल रेकॉर्ड रूममध्ये आढळून येत नाही, असे तहसील कार्यालयातून दिगंबर अहिरवार यांना कळविण्यात आले होते. त्या विरुद्ध अहिरवार यांनी प्रथम अपिलीय अधिकारी तथा निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे अपील करूनही सदर कागदपत्रांचा शोध लागू शकला नाही म्हणून अहिरवार यांनी राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे द्वितीय अपील दाखल करण्यात आले होते. पहिल्या अपिलात खंडपीठात विद्यमान प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार यांनी निर्णय मिळाल्यापासून १५ दिवसांच्या मुदतीत अर्जाच्या अनुषंगाने त्यांनी मागितलेल्या माहिती संदर्भात कार्यालयातील अभिलेखात कसून शोध घ्यावा व त्यानंतर कार्यालयातील उपलब्ध असलेली माहिती नोंदणीकृत पोच डाकने विनामूल्य पुरवावी, असा आदेश दिला होता. त्यावर अहिरवार यांनी दुसरे अपील दाखल केले होते. त्यात सर्व्हे नंबर ७५५ ची कब्जा पावती झालेली नसतानाही सातबारा उताऱ्यावर कब्जा दिल्याचे व कब्जा पावती झाल्याचा शेरा नाशिक तलाठ्याने मारल्याची नोंद असल्याने या कब्जा पावतीची सर्टिफाईड नक्कल कोर्ट कामासाठी मिळावी यासाठी माहिती मागविली होती. 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक