पाथरे खुर्दच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 17:47 IST2021-01-11T17:46:43+5:302021-01-11T17:47:21+5:30
पाथरे : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने, ग्रामविकास आणि आपला पॅनल यांच्यात दुरंगी लढती रंगणार आहेत.

पाथरे खुर्दच्या ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पॅनलमध्ये लढत
ग्रामपंचायतीच्या तीन प्रभागात ९ जागांसाठी अठरा उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामविकास पॅनलकडून प्रभाग क्र. १ मध्ये सागर ज्ञानदेव घुमरे, अश्विनी कैलास चिने, सीमा सचिन गुंजाळ, प्रभाग क्र.२ मध्ये अरुण भीमा बर्डे, पंचशीला संदीप मोकळ, नंदा गोरक्षनाथ पडवळ, तर प्रभाग क्र. ३ मधून बाबासाहेब जगन्नाथ गुंजाळ, हरिदास बाजीराव चिने, सुशीला संजय गीते हे निवडणुकीला सामोरे जात आहेत, तसेच ह्यआपला पॅनलह्णकडून प्रभाग क्र. १ मधून बाबासाहेब जगन्नाथ चिने, सोन्याबाई साहेबराव गुंजाळ, सुरेखा योगेश चिने, प्रभाग क्र. २ मधून विष्णू रामचंद्र बेंडकुळे, मंगला दिवाकर मोकळ, पूनम बाळासाहेब डोंगरे, तर प्रभाग क्र. ३ मधून दिनकर विठ्ठल गुंजाळ, दत्तू महादू चिने, कविता गंगाधर गावडे हे उमेदवार मैदानात उतरले आहेत. पाथरे खुर्दच्या प्रभाग १ मध्ये ३१६, प्रभाग २ मध्ये ३९८, प्रभाग ३ मध्ये १०१२ मतदार असून, या तीनही प्रभागांत उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. विकासाचे मुद्दे घेऊन दोन्ही पॅनलचे उमेदवार मतदारांसमोर जात आहेत. दोन पॅनलमध्ये आमनेसामने काट्याच्या लढती होणार असल्याने, यात कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.