पांढरूण शिवारात हाणामारी, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:25 IST2021-01-11T19:37:04+5:302021-01-12T01:25:46+5:30

मालेगाव : तालुक्यातील पांढरूण शिवारात गेल्या शुक्रवारी विद्युत मोटारीवर झालेल्या खर्चाच्या कारणावरून वाद झाल्याने हाणामारी झाली असून याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Fighting in Pandharun Shivara, crime filed | पांढरूण शिवारात हाणामारी, गुन्हा दाखल

पांढरूण शिवारात हाणामारी, गुन्हा दाखल

भाऊसाहेब चिंधा वाघ (४५) रा. पांढरूण यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी बळीराम चिंधा वाघ, विद्या बळीराम वाघ दोघे रा. पांढरूण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गेल्या शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर हाणामारी झाली. यात फिर्यादी व आरोपी हे भाऊबंद असून शेजारी राहतात. त्यांच्या शेतात विहीर व विद्युत मोटर सामूहिक आहे. फिर्यादीने बळीराम वाघ यांच्याकडे विद्युत मोटारीवर झालेला खर्च मागितला. याचा राग आल्याने त्याने फिर्यादीस वीट फेकून मारल्याने डोके फुटले. फिर्यादीची पत्नी संगीता भांडण सोडविण्यास गेली असता विद्या वाघ हिने तिच्याही डोक्यात वीट फेकून मारून दुखापत केली. शिवीगाळ व दमदाटी करून जीवे ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.

Web Title: Fighting in Pandharun Shivara, crime filed