टाकळी येथे दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:53 IST2020-08-18T21:50:59+5:302020-08-19T00:53:57+5:30

नाशिक : किरकोळ कारणातून टाकळी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत लोखंडी रॉड आणि कोयत्याचा वापर करण्यात आल्याने दोन इसम जखमी झाले असून, हॉटेल आणि किराणा दुकानाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fighting between two groups at Takli | टाकळी येथे दोन गटांत हाणामारी

टाकळी येथे दोन गटांत हाणामारी

ठळक मुद्देदोन जखमी : परस्परविरोधी गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : किरकोळ कारणातून टाकळी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत लोखंडी रॉड आणि कोयत्याचा वापर करण्यात आल्याने दोन इसम जखमी झाले असून, हॉटेल आणि किराणा दुकानाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप रामू पवार (रा. समतानगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, वैदूवाडी भागात राहणारा संशयित पिंटू पवार रविवारी (दि.१६) रात्री त्यांच्या दुकानात आला होता. यावेळी पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याने संशयिताने कोयता घेऊन बळजबरीने घरात प्रवेश केला. शिवीगाळ करीत मारहाण केली.
या झटापटीत पवार यांच्या हाताला कोयता लागल्याने दुखापत झाली. संशयिताने कोयत्याने किराणा दुकानाच्या काचा फोडून तसेच शेजारीच भावाच्या वैष्णवी हॉटेलमधील खुर्च्या व टेबल फेकून देत नुकसान केले.
वीरेंद्र ऊर्फ पिंटू बापू ॅपवार याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित रामू पवार, पवन पवार, रवि पवार, संदीप पवार व नीलेश हरकर आदींनी मारहाण केली.वैदूवाडीत आईशी बोलत असताना टोळक्यातील एकाने वीरेंद्रच्या डोक्यावर कोयत्याने वार केला तर संदीप पवार, पवन पवार यांनी लोखंडी रॉडने आणि नीलेश हरकर याने लाथाबुक्यांनी मारहाण करीत जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून, अधिक तपास हवालदार सोनवणे आणि जमादार परदेशी करीत आहेत.

Web Title: Fighting between two groups at Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.