शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

सटाण्यात दरोडेखोरांचा गोळीबार

By admin | Published: December 13, 2015 12:01 AM

सटाण्यात दरोडेखोरांचा गोळीबार

एक जखमी : दरोड्याचा प्रयत्न फसलासटाणा : शहरातील शिवाजीरोडवरील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात किरण तुळशीराम सोनवणे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जखमीला नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (पान ७ वर)पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी रोडवरील सुनील अहिरराव यांच्या मालकीचे अहिरराव ज्वेलर्स शोरूम आहे. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका सिल्व्हर रंगाच्या स्कार्पिओवर आलेल्या चार दरोडेखोरांनी टॉमीच्या साहाय्याने शोरूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दागिने आणि ठेवलेल्या रोकडची दरोडेखोर शोधाशोध करत असताना कस्तुरी तुळस इमारतीचे मालक किरण सोनवणे यांना जाग आली. ते हातात काठी घेऊन दुकानाजवळ आले असता त्यांना दरोडेखोर दुकानात शिरल्याचे आढळून आले. त्यांनी आरडाओरडा करून काठीने दरोडेखोरांच्या स्कार्पिओच्या मागील बाजूच्या काचा फोडल्या दरोडेखोरांना मज्जाव करून एका दरोडेखोराला पकडून प्रतिकार केला; मात्र गाडीत बसलेल्या एका दरोडेखोराने सोनवणे यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी सोनवणे यांच्या पोटात घुसली तर दुसरी गोळी कमरेला चाटून गेली.सोनवणे गंभीर जखमी झाल्यानंतर आपली सुटका करून दरोडेखोर मालेगावच्या दिशेने पळून जाण्यात सफल झाले. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या सोनवणे यांच्यावर शहरातीलच डॉ. व्ही. के. येवलकर यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना तत्काळ मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रि या करून पोटातील एक गोळी काढण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान घटनेनंतर काही मिनिटातच पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बिनतारी संदेश दिल्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. घटनास्थळी मालेगावचे अपर अधीक्षक सुनील कडासने,उपअधीक्षक अशोक नखाते यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर ठसे तज्ज्ञांना पाचारण करून ठसे घेण्यात आले. दरोडेखोरांच्या तपासासाठी दहा जणांचे पथक रवाना केले असल्याचे पोलीस उपअधीक्षक नखाते यांनी सांगितले. सशस्त्र दरोड्याची तिसरी घटना शहरात या घटनेपूर्वी १९८७ मध्ये मालेगाव रोडवरील रौदळ वस्तीवर सुमारे वीस ते पंचवीस दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. या दरोड्यात दरोडेखोरांनी एका महिलेची हत्त्या केली होती, तर आठ जणांना कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले होते. १९९० मध्ये भाक्षी रोडवरील प्रतिष्ठित व्यापारी धांडे यांच्या निवासस्थानावर दहा ते बारा दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. या दरोड्यात पाच जणांवर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केला होता. त्यानंतर ही गोळीबार करण्याची तिसरी घटना.