शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
4
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
6
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
7
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
8
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
9
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
10
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
11
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
12
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
13
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
14
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
15
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
16
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
17
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
18
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
19
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
20
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

महापालिकेच्या विरोधात लढा : नाशिक मधील हॉस्पीटल संचालकांची बुधवारी ठरणार रणनिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 14:48 IST

राज्य शासनाने २००८ मध्ये अग्नि सुरक्षा उपाययोजना कायदा केला. त्यानंतर २०१२-१३ मध्ये कोलकता येथे एका रूग्णालयाला आग लागल्याचे निमित्त घडल्याने केंद्र सरकारनेही देखील कायदा केला.

ठळक मुद्देमहापलिकेच्या वतीने पूर्वलक्षी पध्दतीने अंमलबजावणीवैद्यकिय व्यवसायिकांनी एकत्र येऊन हॉस्पीटल ओनर्स असोसिएशन स्थापन केली

नाशिक-  अग्नि सुरक्षा उपाययोजना कायद्याचे निमित्त करून शहरातील हजाराहून अधिक हॉस्पीटलच्या नोंदणीत पाच वर्षांपासून अडथळे निर्माण होत आहेत. पूर्वलक्षी आणि चुकीच्या पध्दतीने होत असलेल्या महापालिकेच्या अंमलबजावणीमुळे सर्वच वैद्यकिय व्यावसायिक त्रस्त झाले असून त्यांनी आता संघटीतरीत्या या चुकांना विरोध करण्याचे ठरविले आहे त्यासंदर्भात स्थापन झालेल्या हॉस्पीटल ओनर्स असोसिएशनची बैठक बुधवारी (दि.३) होणार आहे. त्यात रणनीती ठरणार आहे.राज्य शासनाने २००८ मध्ये अग्नि सुरक्षा उपाययोजना कायदा केला. त्यानंतर २०१२-१३ मध्ये कोलकता येथे एका रूग्णालयाला आग लागल्याचे निमित्त घडल्याने केंद्र सरकारनेही देखील कायदा केला. परंतु या दोन्ही कायद्यांची महापलिकेच्या वतीने पूर्वलक्षी पध्दतीने अंमलबजावणी केली जात आहे. महापालिका स्थापन होण्याआधी सर्व परवानग्या घेणा-या आणि महापालिकेच्या स्थापनेनंतर आजवर वेळोवेळी सर्व परवानग्या घेऊन हॉस्पीटल सुरू करणाºया संचालकांना आता मात्र इमारतीत बदल करा किंवा अव्यवहार्य पध्दतीच्या तसेच खर्चिक उपाययोजना करण्यास भाग पाडले जात आहे. त्याच प्रमाणे व्यापारी संकूलातील इमारतीत हॉस्पीटल अनुज्ञेय नसल्याचा नवा नियम लागू करीत बहुतांशी रूग्णालये बेकायदेशीर ठरविण्यात आली आहेत. ही रूग्णालये नियमीत करण्यासाठी लाखो रूपयांच्या हॉर्डशीप रकमा भरण्यास सांगण्यात आले असून तशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.सदरचा कायदा पूर्वलक्षी पध्दतीने अमलात आणू नये तसेच व्यवहार्य बदलच सूचवावेत यासाठी विविध मार्गाने आयुक्त आणि अन्य अधिकाºयांसमोर प्रयत्न करणा-या वैद्यकिय व्यवसायिकांनी एकत्र येऊन हॉस्पीटल ओनर्स असोसिएशन स्थापन केली असून त्या आधारे आता लढा दिला जाणार आहे. येत्या बुधवारी (दि. ३) आयएमएच्या सभागृहात आयोजित या बैठकीत सनदशीर मार्गाने लढा देण्यात येणार असून प्रसंगी न्यायालयीन लढा देण्याबाबत चर्चा करण्यात योणार आहे.---आधी विनंती मग लढाईमहापालिकेशी प्रत्यक्ष चर्चा करून आणि विनंती करूनही उपयोग होत नाही. एकदा भोगवटा प्रमाणपत्र घेतल्यानंतर पुन्हा कोणत्याही ना हरकत दाखल्याची गरज नसताना देखील प्रशासनाकडून दाखला घेण्याच्या निमित्ताने रजिस्ट्रेशन नुतनीकरणात अडवणूक केली जात आहे. त्यामुळे व्यवसायिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटलfireआग