शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

व्यापा-यांकडे अडकलेले पावणेतीन कोटी बळीराजाच्या पदरात; ९७ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 4:14 PM

नाशिक बार असोसिएशनकडून ज्या शेतक-यांचे धनादेश वठलेले नाही, अशा धनादेश बाऊन्स झालेले खटले न्यायालयात विविध तालुका व जिल्हा पातळीवर विनाशुल्क लढविले जातील, असेही दिघावकर यावेळी म्हणाले.

ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरिक्षक प्रताप दिघावकरांचा दणका५९० शेतक-यांना २ कोटी ७४ लाख ५८२ रुपये प्राप्त झाल्याची माहिती बार असोसिएशन चालविणार मोफत खटला

नाशिक : परिक्षेत्रातील अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार या पाच जिल्ह्यांमधील द्राक्ष, कांदा, डाळींब, केळी उत्पादक शेतक ऱ्यांचे मागील अनेक वर्षांपासून विविध व्यापाऱ्यांकडे मालविक्रीची मोठी रक्कम अडकून पडली होती. बळीराजाच्या कष्टाचा पैसा विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या दणक्याने पदरात पडला आहे. परिक्षेत्रातील सुमारे ५९० शेतक-यांना २ कोटी ७४ लाख ५८२ रुपये प्राप्त झाल्याची माहिती दिघावकर यांनी बुधवारी (दि.७) पत्रकार परिषदेत दिली.शेतक-यांकडून वारंवार याबाबत पाठपुरावा केला जात होता. तसेच पोलिसांकडे यापुर्वीही दाद अनेक शेतक-यांनी मागितली होती; मात्र राजकिय वरदहस्त आणि गुंडांचे पाठबळ असलेल्या व्यापा-यांकडे पोलीस खात्याकडून वक्रदृष्टी केली जात नव्हती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचे भुमिपूत्र असलेले दिघावकर यांनी महिनाभरापुर्वी नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरिक्षक पदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी सर्वप्रथम शेतक-यांचा कष्टाचा पैसा बुडविणाºया व्यापा-यांवर कारवाईचा दंडुका चालविला. पाचही जिल्ह्यांच्या अधीक्षकांना त्यांनी आदेशित करत तत्काळ शेतक-यांच्या फ सवणूक अर्जानुसार संबंधित व्यापा-यांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे फर्मान सोडले. यानंतर तब्बल ५९३ शेतक-यांचे अर्ज संपुर्ण परिक्षेत्रातून प्राप्त झाले. त्यापैकी ९७ व्यापा-यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.ज्या व्यापा-यांकडून शेतक-यांना मालाच्या खरेदीची रक्कम देण्यास असमर्थता दर्शविली जात होती, अशा व्यापा-यांचा पोलिसांकडून शोध घेत त्यांच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत संबंधित शेतक-याची थकित रक्कम देण्याबाबत ह्यखाकीह्णच्या शैलीत समज दिली गेली.१३३ व्यापा-यांनी दर्शविली तयारी१३३व्यापा-यांनी शेतक-यांचे थकविलेली रक्कम देण्यास सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात महाराष्टतील लबाड व्यापा-यांचा शोध घेत त्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे. दुस-या टप्प्यात देशातील अन्य राज्यांमध्ये नाशिक परिक्षेत्रातील विशेष तपास करणारे दहा पथके धडक देत व्यापा-यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे दिघावकर म्हणाले. पाचही जिल्ह्यांच्या अधीक्षकांनी दहा विशेष पथकांची नियुक्ती केली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.बार असोसिएशन चालविणार मोफत खटलानाशिक बार असोसिएशनकडून ज्या शेतक-यांचे धनादेश वठलेले नाही, अशा धनादेश बाऊन्स झालेले खटले न्यायालयात विविध तालुका व जिल्हा पातळीवर विनाशुल्क लढविले जातील, असेही दिघावकर यावेळी म्हणाले. नाशिक बार असोसिएशनच्या बहुतांश वकिलांनी हा निर्णय बोलून दाखविला असून शेतक-यांच्या कष्टांचा पैसा मिळवून देण्यासाठी सहानुभूती दाखविली आहे.जिल्हानिहाय मिळालेली रक्कमनाशिक ग्रामिण - फसवणूक रक्कम - १८ कोटी १३ लाख, २८ हजार २७२प्राप्त रक्कम- १ कोटी ९ लाख ६६ हजार ९७२अहमदनगर - फसवणूक रक्कम- १८ लाख ५२ हजार ३४८प्राप्त रक्कम- २ लाखजळगाव- फसवणूक रक्कम २६ लाख ७४ हजार ६९१प्राप्त रक्कम - ३ लाख १२ हजारनंदुरबार - फसवणूक रक्कम- ५ लाख ९५ हजार ६१०प्राप्त रक्कम- ५ लाख ९५ हजार ६१०धुळे- फसवणूक रक्कम ५ लाख १७ हजार (वसुली शुन्य)---- 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीfraudधोकेबाजीAgriculture Sectorशेती क्षेत्रCrime Newsगुन्हेगारी