शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

‘सह्याद्री’च्या कुशीत बहरला निसर्गाचा पुष्पोत्सव

By अझहर शेख | Published: September 25, 2018 12:35 AM

‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

नाशिक : ‘सह्याद्री’च्या कुशीत वसलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पावसाळा संपताच निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू झाला आहे. वर्षा ऋतूत धरणीने पांघरलेल्या हिरव्या शालूवर विविध प्रजातींच्या रंगीबेरंगी रानफुलांच्या ताटव्यांचा जणू आगळावेगळा साज भंडारदरा परिसरात डोळ्यांचे पारणे फेडत आहे. निसर्गप्रेमींना भंडारदऱ्यातील हे अभयारण्य क्षेत्र पुन्हा एकदा खुणावू लागले आहे.  अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्टतील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व तेथील भूभागावर रानफुलांचे ताटवे बहरले आहेत. वृक्षसंपदेने नटलेले कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटकांच्या नेहमीच पसंतीला उतरले आहे. पावसाळ्यात याच परिसरात विविध धबधब्यांनी आलेल्या पर्यटकांना आकर्षित केले तर आता पुन्हा निसर्गाकडून सौंदर्याची वेगळीच उधळण येथे केली जात असल्याचा अनुभव पर्यटक घेत आहेत. येथील मोकळ्या भूखंडांवर हिरव्यागार गवताच्या गालिच्यावर रानफुले फुलली असून, निसर्गाचा हा पुष्पोत्सव निसर्ग छायाचित्रकारांसह पुष्पप्रेमी व फुलपाखरूप्रेमींना भुरळ घालत आहे.कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याचे क्षेत्र शेंडी गावापासून सुरू होते. भंडारदरा व राजूर अशा दोन वनपरिक्षेत्रात विभागलेल्या या अभयारण्यात सुमारे १८ ते २० लहान-मोठ्या गावांचा समावेश होतो. आदिवासी लोकवस्ती असलेल्या या सर्व गावांमध्ये नाशिक वन्यजीव विभागाने गाव परिस्थितीकीय विकास समिती गठित केली असून स्थानिक रहिवाशांना रोजगार उपलब्ध करून देत जंगल संवर्धनासाठीही प्रवृत्त केले आहे. आॅक्टोबरअखेरपर्यंत हा पुष्पोत्सव भंडारदरा परिसरात पहावयास मिळणार आहे.अशा आहेत रानफुलांच्या प्रजातीया अभयारण्य क्षेत्रात बहरलेल्या रानफुलांमध्ये टोपली भुई, खुरपापणी, कवळा, नीलकंठ, रानआले, रानहळद, जांभळी मंजिरी, सोनकी, कानपेट, मोठी सोनकी, लाल तेरडा, हिरवी निसुर्डी, जांभळी चिरायत, रान अबोली, पिवळी कोरांटी, ढाल तेरडा, कळलावी, धायटी, आभाळी-नभाळी, हळदी-कुंकू, अग्निशिखा, सोनसरील, घाणेरी, पांढरी कोरांटी अशी विविध रानफुले, मधमाशा व फुलपाखरांची अमाप जैवविविधता या अभयारण्य क्षेत्रात पहावयास मिळते.भंडारदरा परिसरात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात विविध रानफुलांचे ताटवे फुललेले दिसतात. निसर्गाची जैवविविधता अभ्यासण्याची उत्कृष्ट संधी या काळात मिळते. फुलपाखरू, मधमाशांच्या प्रजातीही दिसतात. पर्यटकांनाही या पुष्पोत्सवाचे आकर्षण असते.अकोले तालुक्यातील अखेरच्या टोकाला असलेल्या सर्वच गावांमध्ये फुलांचा बहर सध्या पहावयास मिळतो.  - रवि ठोंबाडे, गाइड, अकोले

टॅग्स :Natureनिसर्गNatural Calamityनैसर्गिक आपत्ती