शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कंपनीकडून बांधावर खतविक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:45 IST

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील शेतमॉल अ‍ॅग्री प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकरी सुविधा केंद्राद्वारे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन खते उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा पहिला प्रयोग राबवण्यात आला.

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील शेतमॉल अ‍ॅग्री प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकरी सुविधा केंद्राद्वारे ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाऊन खते उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा पहिला प्रयोग राबवण्यात आला. कंपनीने आत्तापर्यंत आठ गावांतील १०० शेतकºयांपर्यंत खते पोहोचवली आहेत.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये याकरिता शेतकरी गटांनी मागणी करून विक्रेत्यांनी थेट बांधावर खते देण्याची संकल्पना सरकारमार्फत राबविली जात आहे. परंतु दोडी बुद्रुक येथील शेतकरी कंपनीने पुढाकार घेत हमाली, वाहतूक खर्च न आकारता ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर शेतकºयांना खते उपलब्ध करून दिली आहेत. कंपनीचे अध्यक्ष गणपत केदार, संचालक सुखदेव आव्हाड, मधुकर कांगणे, संतोष ऊगले, बाळासाहेब दराडे, विठ्ठल वाघ, चंद्रभान जाधव यांनी मेहनत घेतली, तर रावसाहेब दराडे, शिवाजी दराडे, दीपक बर्के आदींनी मदत केली. दोडी बुद्रुक येथील शेतकºयांनी एकत्र येत कंपनीची स्थापना केल्यानंतर शेतकºयांसाठी विविध उपक्रम राबविले. कांद्याला चांगला दर मिळण्यासाठी दिल्ली येथील बाजारपेठेत कांदा पाठवण्यात येतो. मंत्रालय आठवडे बाजारात कंपनीतर्फे नियोजन करून आठवडे बाजार चालविला जात आहे. लॅकडाउन काळात कंपनीने मुंबई येथे थेट घरपोहोच भाजीपाला उपक्रम राबवला आहे. तर आता शेतकºयांना माफक दरात बांधावर खते उपलब्ध करून दिली जात आहेत.----------------------आठ गावात खतेनळवाडी, कासारवाडी, चापडगाव, निºहाळे, खंबाळे, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, नांदूरशिंगोटे या गावात शेतकºयांना बांधावर खते उपलब्ध करून दिली जात आहेत. शेतकºयांनी मागणी करताच कंपनीद्वारे विविध खतांचा पुरवठा करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक