विमा कर्मचारी संघटनेतर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:06 IST2019-03-19T01:05:59+5:302019-03-19T01:06:20+5:30

विमा कर्मचारी संघटनेतर्फे जीवनप्रकाश कार्यालयात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

 Females of Women Employees Association | विमा कर्मचारी संघटनेतर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

विमा कर्मचारी संघटनेतर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

नाशिक : विमा कर्मचारी संघटनेतर्फे जीवनप्रकाश कार्यालयात विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भेटवस्तू म्हणून लंच बॉक्स व पाण्याची बाटली असा संच देण्यात आला.
अतिरिक्त सिव्हिल सर्जन निखिल सैंदाणे यांनी संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच आपल्या आरोग्याची चिंता न करता सामान्य माणसाला लाज वाटेल, अशी स्वच्छतेची व रुग्णांच्या सेवा-सुश्रूषाची कामे करणाºया चतुर्थ श्रेणी महिला कर्मचाºयांचा अभिमान वाटतो, असे सैंदाणे यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप कांतीलाल तातेड यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस मोहन देशपांडे, आभार प्रिया जोशी तर सूत्रसंचालन महिला आघाडी प्रमुख अनघा यार्दी यांनी केले.
सामाजिक संघटनांच्या कार्याचे कौतुक
केवळ आर्थिक राजकीय प्रश्नच नव्हे तर गत काळात आर्थिक, सामाजिक दृष्टीने दुर्बल घटकांसाठी संघटना करीत असलेल्या कार्याचे कौतुक डॉ. डी. एल. कराड यांनी केले. कामगार संघटनेच्या सचिव सिंधुताई शार्दुल व वरिष्ठ मंडल प्रबंधक टी. डी. गडपायले यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title:  Females of Women Employees Association

टॅग्स :Nashikनाशिक