प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:41 IST2019-07-02T00:40:41+5:302019-07-02T00:41:05+5:30

वाणीभूषण प. पू. जैन महासती प्रीतिसुधाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.

 Felicitated by Pritishudhagaji Education Fund | प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे सत्कार

प्रीतिसुधाजी शिक्षण फंडातर्फे सत्कार

नाशिक : वाणीभूषण प. पू. जैन महासती प्रीतिसुधाजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.
यानिमित्त प. सा. नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगूरचे संघपती शांतीलाल लुणावत उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षणात चांगले भवितव्य निर्माण करता येते. प्रीतिसुधाजी शिक्षण फंडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा फंड उभा केला आहे. सदर फंड वाढविण्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासनदेखील शांतीलाल लुणावत यांनी दिले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत अ‍ॅड. विद्युलल्लता तातेड यांनी केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष जे. सी. भंडारी, वेदास अकॅडमीच्या नीता अरोरा, डॉ. सुषमा दुगड, प्रा. लोकेश पारख आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कोठारी यांनी केले. कार्यक्रमास संघपती रामजल भंडारी, अनुप बेदमुथा, विनोद जालोरी, बालचंद चोरडिया, विनोद चोरडिया, नीलेश मुनोत, दिलीप भंडारी, नितीन कोचर, मोहनलाल लोढा, मोहनलाल कटारिया, सुभाष लुणावत, लखमीचंद पारख, डॉ. कन्हैयालाल बलदोटा, मोहनलाल कुमठ, शंकरलाल गांग, प्रा. विजय डोशी, रमेश कोठारी, राजेंद्र डुंगरवाल, गौतम सुराणा आदी उपस्थित होते. यावेळी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

Web Title:  Felicitated by Pritishudhagaji Education Fund