Feeding of animals by returning rain | परतीच्या पावसाने जनावरांच्या चाऱ्याचे हाल
परतीच्या पावसाने जनावरांच्या चाऱ्याचे हाल

खेडलेझुंगे : परतीच्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला आहे. पिकांसह चाºयाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसह मेंढपाळांना रस्त्याच्या बाजूला उगवलेले गवत खाऊ घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाळीव जनावरांच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
परतीच्या पावसामुळे शेतात पाणी साचून असल्याने पाळीव प्राण्यांचा चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शेतात चिखल असल्याने शेळ्या-मेंढ्यांना रस्त्याच्या कडेला असलेले गवत व झाडपाला खाऊ घालावा लागत आहे. शेतात चिखल आणि पाणी असल्याने शेळ्या, मेंढ्या, गायी यांना शेतात चरण्यासाठी सोडता येत नाही. सर्व शेत हिरवेगार दिसत आहे; परंतु त्याच्याकडे जनावरांना बघण्याशिवाय इतर पर्याय नाही. त्यामुळे जनावरांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचा पाला आणि उगलेले गवत खाऊन पोटाची खळगी भरावी लागत आहे. तर रस्त्यावर जनावरे चरायला सोडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत.

Web Title: Feeding of animals by returning rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.