निफाड परिसरात पावसाने द्राक्षमणी तडकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:46 IST2021-02-18T21:04:54+5:302021-02-19T01:46:16+5:30

निफाड : शहर, परिसरातील गावांना गुरुवारी अवकाळी पावसाने झोडपल्याने द्राक्षमणी तडकण्याच्या भीतीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Fear of rain cracking the vines in Nifad area | निफाड परिसरात पावसाने द्राक्षमणी तडकण्याची भीती

निफाड परिसरात पावसाने द्राक्षमणी तडकण्याची भीती

ठळक मुद्दे हा पाऊस पाऊण तास सुरु होता.

निफाड : शहर, परिसरातील गावांना गुरुवारी अवकाळी पावसाने झोडपल्याने द्राक्षमणी तडकण्याच्या भीतीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

निफाड तालुक्यात पंधरा दिवसांपासून उन्हाने भाजून काढले होते. त्यात गुरुवारी सकाळपासून वातावरणात उष्मा व दमटपणा जाणवत होता. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान वादळी वारे व पावसाने हजेरी लावली. निफाड, जळगांव, शिवरे, शिवडी इतर गावांना जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे निफाड येथील शांतीनगर जवळील झाडाची मोठी फांदी नाशिक औरंगाबाद रोडवर तुटून पडली होती. हा पाऊस पाऊण तास सुरु होता.
अवकाळी पावसामुळे ज्या द्राक्ष बागांच्या मण्यांमध्ये पाणी उतरले आहे व जी द्राक्षे विक्रीला आली आहेत त्या बागांचे द्राक्ष मणी तडकण्याचा धोका वाढला आहे. पावसाने द्राक्ष बागांवर बुरशीचा प्रादूर्भाव वाढणार असल्यामुळे द्राक्ष बागायतदारांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Fear of rain cracking the vines in Nifad area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.