महिरावणीजवळ अपघातात पिता-पुत्र ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 00:54 IST2021-03-31T22:52:28+5:302021-04-01T00:54:43+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील महिरावणीजवळ रस्ता ओलांडतांना दुचाकीच्या धडकेने पिता-पुत्र ठार झाले.

महिरावणीजवळ अपघातात पिता-पुत्र ठार
ठळक मुद्देपचार सुरू असतांना दोघांचीही प्राणज्योत मालवली.
नाशिक त्र्यंबक महामार्गावर महिरावणी शिवारात रस्ता ओलांडणाऱ्या रायसिंग धर्मा तडवी (३५) व त्यांचा दोन वर्षांचा मुलगा ऋषभ रायसिंग तडवी यांना त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकीस्वाराने (एमएच १५-डीएन ६६६०) जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही बापलेक जखमी झाले. त्यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना दोघांचीही प्राणज्योत मालवली. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात शिवाजी माकत्या तडवी रा.शिवशक्ती चौक नाशिक यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पो.नि.संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.शिवचरण पांढरे अधिक तपास करीत आहेत.