'तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला, तुझा गेम वाजवतो'; रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 00:00 IST2025-03-18T00:00:29+5:302025-03-18T00:00:48+5:30

आरोपींविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fatal attack on rickshaw driver | 'तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला, तुझा गेम वाजवतो'; रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

'तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला, तुझा गेम वाजवतो'; रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला

Nashik Crime: गावातीलसुखदेवनगरमध्ये कोयताधाऱ्यांनी एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात रिक्षाचालक संकेत उत्तम दोंदे (२८, रा. पाथर्डी) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी संशयित स्वप्निल सोनकांबळे, मयूर तांबे, सोनू सावंत, गौरव आखाडे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी ७वाजता संकेत उत्तम दोंदे रिक्षातून (क्र. एमएच १५ ईएच १७६५) घरी जात होता. संशयित हल्लेखोरांनी कोयत्याने रिक्षांची काच फोडून रिक्षा थांबविली. सावंत व आखाडे यांनी दोंदेला बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण
करण्यास सुरुवात केली. यावेळी सोनकांबळे याने 'तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला...' असे म्हणत कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला. मात्र, सुदैवाने तो वार चुकल्याने दोंदे याच्या चेहऱ्याला कोयता घासला. 

'तुझ्या लोकांमुळे नट्या साळवेला जीव गमवावा लागला. आज तू भेटला आहे, तुझा गेम वाजवतो' असे म्हणत जोरजोरात आरडाओरडा व शिवीगाळ करत संशयित रस्त्यावर कोयता आपटत होते. दोंदेला जमिनीवर खाली पाडत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्याच्या खिशातील चार हजार रुपये काढून घेतले. दोंदेने त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका करत एका घरात जाऊन लपला. तेथून पत्नीला फोन करून बोलावून घेतले होते.
 

Web Title: Fatal attack on rickshaw driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक