इगतपुरीजवळ भीषण अपघात: ३ ठार, १ जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2024 09:47 IST2024-01-01T09:46:20+5:302024-01-01T09:47:33+5:30

आज पहाटे चार वाजेच्या वेळी हा अपघात झाला.

fatal accident near igatpuri and 3 died 1 seriously injured | इगतपुरीजवळ भीषण अपघात: ३ ठार, १ जण गंभीर जखमी

इगतपुरीजवळ भीषण अपघात: ३ ठार, १ जण गंभीर जखमी

गणेश घाटकर, इगतपुरी: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई महामार्गावर बोरर्टेंभे येथे भीषण अपघातात तीन ठार व एक जण जखमी झाला. भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

आज पहाटे चार वाजेच्या वेळी हा अपघात झाला. ह्या घटनेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. ह्या अपघातात एमएच ०२ ईएक्स ६७७७ ह्या क्रमांकाच्या मर्सिडीज कारचा चक्काचूर झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलिस घोटी यांनी अपघाताची माहिती समजताच मदतकार्य केले.

Read in English

Web Title: fatal accident near igatpuri and 3 died 1 seriously injured

टॅग्स :Accidentअपघात