शेतकरी चिंतित : हवेतील आर्द्रतेमुळे फूलं, फळगळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 01:20 PM2020-03-15T13:20:31+5:302020-03-15T13:20:51+5:30

पाटोदा : येवला तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून दिवसभर कडक ऊन, रात्री थंडी व पहाटे प्रचंड प्रमाणात दव पडत असून, या बदलत्या हवामानाचा फटका तालुक्यातील डाळिंब पिकाला बसला आहे. यामुळे डाळिंब उत्पादक हवालदिल झाले आहेत. या बदलत्या हवामानामुळे बागेमध्ये मोठ्या प्रमाणात फुले व फळे गळत आहेत. त्यामुळे औषध फवारणीचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

 Farmers worried: The humidity in the air increased flowers, orchards | शेतकरी चिंतित : हवेतील आर्द्रतेमुळे फूलं, फळगळ वाढली

शेतकरी चिंतित : हवेतील आर्द्रतेमुळे फूलं, फळगळ वाढली

Next
ठळक मुद्दे दर्जा घसरल्याने दरात होणार घट : डाळिंबबागांवर बदलत्या हवामानाचा परिणाम होत असून, बागा विविध रोगांना बळी पडत असल्याने उत्पादनाचा दर्जा खालवत आहे. फळांची वाढ न होणे असे विविध परिणाम बागेवर होताना दिसत आहेत. दर्जाहीन उत्पादन निघाल्यास शेतकऱ्यांना डाळिंब अत्




शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागलेल्या अवकाळी पाऊस, कडाक्याची थंडी, प्रचंड दव अशी संकटांची मालिका थांबण्याचे नाव घत नाही. गेल्या काही दिवसांपासून परिसरात उन्हाळ्याची चाहूल लागली असलीतरी ढगाळ हवामान, कडक ऊन व रात्री पडणारी थंडी व पहाटेचे दव आशा विचित्र हवामानामुळे फळबागाधोक्यात आल्या आहेत. सकाळी पडणाºया दवामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त वेळ राहात आहे. या दवामुळे फळाच्या देठाजवळ पाणी साचत असल्याने पिकाचे भाग ओले राहातात, त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने पिकांच्या कोवळ्या भागास इजा पोहोचून फूल व फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे डाळिंब पीक धोक्यात आले आहे. डाळिंबबागांसाठी केलेला लाखो रु पयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने डाळिंब उत्पादक हवालदिल झाला आहे.
 
फळधारणेस अडथला : पाटोदा परिसरात सुमारे साडेसातशे ते आठशे हेक्टर डाळिंबबागा असून, या भागातील शेतकरी दर्जेदार डाळिंब उत्पादन करीत असून, त्यांची मोठ्या प्रमाणात परदेशात निर्यात करीत आहेत. हवामानातील बदलामुळे फुलांवर येणाºया मधमाश्यांचे प्रमाणही कमी झाल्यामुळे फळधारणेस अडचण येत आहे. यामुळे नर फुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मधमाश्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतकरीवर्ग विविध उपाययोजना करीत आहेत.


कोट :- हवामानात वारंवार बदल होत आहे. त्यामुळे बागेवर दिवसातून दोन वेळेस बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत आहे. खर्च करूनही पीक हातात येते की नाही याची शंका आहे.
- सुकदेव मेंगाणे, शेतकरी, पाटोदा
फोटो : १४डाळींब

Web Title:  Farmers worried: The humidity in the air increased flowers, orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.