पिंपळगाव वाखारीत शेतकऱ्यांची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:26 IST2021-06-20T16:25:34+5:302021-06-20T16:26:31+5:30

पिंपळगाव वाखारी : परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसानंतर मृगाच्या पावसाने पूर्णत: पाठ फिरवल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

Farmers' work in Pimpalgaon Wakhari was disrupted | पिंपळगाव वाखारीत शेतकऱ्यांची कामे खोळंबली

पिंपळगाव वाखारीत शेतकऱ्यांची कामे खोळंबली

ठळक मुद्देकाही ठिकाणी झालेली पेरणी पावसाअभावी धोक्यात



पिंपळगाव वाखारी : परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसानंतर मृगाच्या पावसाने पूर्णत: पाठ फिरवल्याने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या असून, शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

काही ठिकाणी झालेली पेरणी पावसाअभावी धोक्यात आली असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
परिसरात रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावत पेरणीपूर्व मशागतीला वेग दिला. परंतु मृग नक्षत्राचा पाऊस येईल या आशेवर शेतकर्‍यांनी पेरणी थांबवली. आता मृग नक्षत्र संपण्याच्या मार्गावर असतानाही वरुणराजाने परिसरात पाठ फिरवली आहे. मृगाची पेरणी खरिपासाठी उत्तम असल्याने शेतकरी मृग नक्षत्राच्या पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असतात. रोहिणी नक्षत्राच्या पावसात काही शेतकऱ्यांनी केलेली पेरणी उन्हाच्या तीव्रतेमुळे धोक्यात आली असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दुबार पेरणीचे संकट आल्यास शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसणार आहे.

Web Title: Farmers' work in Pimpalgaon Wakhari was disrupted