कांदा रोपांच्या राखणीसाठी शेतकऱ्यांचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:17 AM2019-12-30T00:17:11+5:302019-12-30T00:17:27+5:30

लोहोणेर : यावर्षी मोठ्या प्रमाणावर जोरदार अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्याचबरोबर उन्हाळ कांदा रोपांचे देखील सर्वत्र ...

Farmers watch for onion plantations | कांदा रोपांच्या राखणीसाठी शेतकऱ्यांचा पहारा

कांदा रोपांच्या राखणीसाठी शेतकऱ्यांचा पहारा

Next
ठळक मुद्देलोहोणेर : चोरीच्या वाढत्या घटनांचा परिणाम; वातावरणातील बदलामुळे रोपांचे नुकसान

लोहोणेर : यावर्षी मोठ्या प्रमाणावर जोरदार अवकाळी पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्याचबरोबर उन्हाळ कांदा रोपांचे देखील सर्वत्र नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी दोन-तीन वेळा महागडी कांदा रोपे टाकून देखील बदलत्या वातावरणात रोपे खराब होत असल्याने रोपांचा तुटवडा भासू लागला आहे.
कांदा रोपांच्या चोरीच्या घटना बहुतांशी ठिकाणी वाढल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता रात्रीचापहारा देऊ लागल्याचे चित्र कसमादे परिसरात दिसू लागले आहे. खरीप हंगामातील पावसाळी कांदा परतीच्या व अवकाळी पावसाने खराब झाला. त्यामुळे सध्या आहे त्या कांद्याच्या १० ते २० टक्केच उत्पादन कांद्याचे निघत असल्याने पर्यायाने कांद्याला मागणी वाढून सध्या सात ते आठ हजार रूपयांपर्यंत दर आहेत. त्याचबरोबर अवकाळी पावसात उन्हाळ कांद्याच्या रोपांचेदेखील अतोनात हाल झाले. दिवाळीआधी उन्हाळ कांद्याची रोपे टाकलेल्या व टप्प्याटप्प्यात रोपे तयार करणाºया सर्वच शेतकºयांची कांदा रोपे खराब झाली. कांदा उत्पादक शेतकºयांनी दोन-तीन वेळा कांदा रोपे तयार केली, मात्र जास्तीचा पाऊस ओली जमीन त्याचबरोबर दररोज पडणाºया धुक्यामुळे पन्नास टक्क्यांहून अधिक रोपे खराब होत आहेत. तयार झालेले लागवडीयोग्य रोपांच्या चोरी जाण्याच्या घटना वाढू लागल्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस कांदा रोपे असलेल्या शेताची राखण करू लागले आहेत. कसमादे भागातील अनेक शेतकरी गेल्या तीन-चार दिवसांपासून लागवडी योग्य कांदा रोपाच्या शेतात रात्रीच्या वेळेस राखण करून जागता पहारा देत आहेत. कांदा रोपे वातावरणामुळे संकटात आहेच, पण आता लागवडीयोग्य रोपे चोरीचेही संकट शेतकºयांपुढे उभे ठाकले आहे.

कांदा रोपे रस्त्याच्या काठाला असल्याने चोरी गेल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. देवळा परिसरासह इतरत्र कांदा रोपे चोरीच्या घटना वाढल्याने पाच-सहा दिवसांपासून रोपांची रात्रीच्या वेळेस राखण करीत आहे.
- धनंजय बोरसे, कांदा उत्पादक शेतकरी सावकी.

Web Title: Farmers watch for onion plantations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.