शेतकरी पायी निघाले मुंबईकडे; तर नाशिकमध्ये झाला गुन्हा दाखल
By संदीप भालेराव | Updated: June 27, 2023 18:41 IST2023-06-27T18:40:44+5:302023-06-27T18:41:49+5:30
पायी मोर्चा काढणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी पायी निघाले मुंबईकडे; तर नाशिकमध्ये झाला गुन्हा दाखल
नाशिक : पोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करत पायी मोर्चास परवानगी नसतानादेखील अंबडगाव ते मंत्रालय, असा पायी मोर्चा काढणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी अंबड गाव ते मंत्रालयापर्यंत पायी मोर्चा सुरू केला आहे. या पायी मोर्चास पोलिस आयुक्तांनी परवानगी नाकारलेली असतानादेखील मोर्चा काढण्यात आल्याने पोलिस नाईक अशोक आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिस ठाण्यात साहेबराव दातीर, राकेश दोंदे, रामदास दातीर , शरद फडोळ, शरद दातीर आदी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.