Farmers suffer from lasalgavi mokat cattle | लासलगावी मोकाट जनावरांमुळे शेतकरी त्रस्त
लासलगावी मोकाट जनावरांमुळे शेतकरी त्रस्त

लासलगाव : परतीच्या पावसाने मेटाकुटीला आलेल्या बळीराजाचे उरलेसुरले पीक मोकाट जनावरे फस्त करीत असल्याने लासलगाव परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. लासलगावमध्ये मोकाट जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणावर हैदोस सुरू असून, परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. शहरात जवळपास ३००-३५० पर्यंत मोकाट जनावरे आहेत. यात गायी, वळू आणि छोट्या वासरांचा समावेश आहे. सदर गायी २५-५० च्या टोळक्याने शेतात येतात आणि संपूर्ण शेत उद्ध्वस्त करतात. मका, सोयाबीन, गहू, हरबरा तसेच सर्व फळपिकांचे देखील अतोनात नुकसान करीत आहे.
लासलगाव परिसर हा बहुविध शेती पिके असणारा आणि खूप मोठे क्षेत्र असल्याने त्यास तारेचे कुंपण करणे परवडण्याजोगे नाही. यामुळे परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्र ार केली असून, प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही. सदर जनावरे माणसांवरदेखील हल्ला करतात तसेच रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
मागे शहरातील एका इसमाचा मोकाट जनावरांच्या हल्ल्यात
मृत्यू झाला होता. अस्मानी आणि सुलतानी संकटासोबत आता हे
नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभे
आहे. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास वरिष्ठ अधिकारी वर्गाकडे याची तक्र ार तसेच आंदोलन करण्याचा इशारा सचिन होळकर यांनी दिला आहे.
(फोटो ०८ लासलगाव)

Web Title: Farmers suffer from lasalgavi mokat cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.