सोनेवाडीत जलसाक्षरता अभियानास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 18:00 IST2019-12-22T17:59:52+5:302019-12-22T18:00:18+5:30
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील सोनेवाडी येथे युवा मित्र संस्थेमार्फतराबविण्यात आलेल्या जलसाक्षरता अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सोनेवाडीत जलसाक्षरता अभियानास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
युवा मित्र संस्थेचे संस्थापक सुनील पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे तालुका समन्वयक प्रितम लोणारे यांनी अभियान आयोजित केली होते. त्या अनुषंगाने पाणी वापर संस्थेचे महत्व, नियोजन व व्यवस्थापन, जबाबदारी तसेच गावातील उपलब्ध पाण्याचा ताळेबंद करून कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक घेऊन दरडोई उत्पन्नात कशी भर पाडता येईल व गावातील भूजल पातळीत कशी वाढ करता येईल याबद्दल लोणारे यांनी मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेत युवा मित्र, टाटा ट्रस्ट व ए. टी. ई. चंद्रा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा मित्र संस्थेच्या जलसमृद्धी प्रकल्पाअंतर्गत प्रकल्प व्यवस्थापक अजित भोर, प्रकल्प समन्वयक मंगेश बोपचे यांच्या मार्गदर्शनाने प्रितम लोणारे यांनी गावात असलेल्या जलस्रोतांमधील गाळ काढण्यासाठीची संपूर्ण प्रकिया समजावून सांगितली. त्यामध्ये युवा मित्र, टाटा ट्रस्ट व ए. टी. ई. चंद्रा फौंडेशन मार्फत पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासना मार्फत मशीनसाठी लागणारे इंधन देण्यात येईल तसेच बंधाºयातील निघणाºया गाळाची वाहतूक ही लोकसहभागातून करायची आहे असेही त्यांनी सांगितले. गावातील पाणी वापर व नियोजन याबाबतचा विकास आराखडा उपस्थित ग्रामस्थांकडून तयार करण्यात आला. यावेळी युवा मित्र संस्थेचे क्षेत्र समन्वयक सोमनाथ वाघ, सोनेवाडीचे सरपंच कैलास सहाणे, माजी सरपंच अनिल परदेशी, नारायण परदेशी, बाळू देशमुख, विलास देशमुख, प्रमोद रावले, सुरेश सहाणे, फकीरा आदमे आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.