शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रब्बीच्या हंगामासाठी शेतकरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 5:35 PM

सायखेडा : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली, शेतीचे अतोनात नुकसान झाले. माथी कर्ज वाढले. चार महिने कुटुंबाचे कष्ट वाया गेले. शेती धोक्यात आली. अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.

ठळक मुद्देखरीप गेला पाण्यात : चांगल्या पिकासाठी निसर्गाला साकडे

सायखेडा : अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली, शेतीचे अतोनात नुकसान झाले. माथी कर्ज वाढले. चार महिने कुटुंबाचे कष्ट वाया गेले. शेती धोक्यात आली. अशी भयानक अवस्था असतानाही शेतकरी पुन्हा एकदा रब्बीच्या हंगामासाठी सज्ज झाला आहे.खरीप हंगाम पाण्यात गेला आता रब्बीतरी पिकू दे असे साकडे त्याने निसर्गाला घातले असून एका महिन्यातील सर्व दु:ख बाजूला सारत रब्बीच्या हंगामाला सुरवात केली आहे, सगळीकडेच या नवीन आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. रब्बीच्या हंगामातील पिके उभी करण्याच्या कामाला वेग आला आहे.जून महिन्यात सुरु होणारा खरीप हंगाम सुरवातीपासून दमदार पावसामुळे दमदार राहिला, सोयाबीन, मका, बाजरी, भुईमुंग यासह नगदी पिके टमाटे, कोबी, फ्लॉवर, वांगे, वेलवर्गीय पिके, पालेभाज्या हि सर्वच पिके सुरवातीपासून जोमात होती.मागील वर्षी दुष्काळ परिस्थितीमुळे जमीन अनेक महिने पडून असल्याने मेहनत करून जमिनीचा पोत टिकवून असल्याने पिके बहरली होती. हंगाम अंतिम टप्प्यात आला होता, पिके परीपक्वतेकडे झुकली होती, आणि अचानक परतीच्या पावसाने मागील महिन्यात सरासरी चौदा दिवस मुक्काम ठोकला आणि अचानक आलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.सोंगलेली धान्य जमिनीत सडली, शेतात उभी असलेले धान्य सडून गेली. भाजीपाला आणि फळभाज्यावर विविध रोगांनी थैमान घातले त्यामळे लाखो रु पये भांडवल म्हणून खर्च केलेले पाण्यात गेले.खरीप हंगामातील जवळपास नव्वद टक्के नुकसान झाले असा कृषी विभागाकडून अधिकृतपणे सांगत असले तरी प्रत्यक्ष मात्र अनेक ठिकाणी १०० टक्के नुकसान झाले आहे. सर्व सहन करत शेतकरी पुन्हा एकदा रब्बीचे पिके शेतात उभी करण्यासाठी तयार झाला आहे. भरपूर पाणी असल्याने रब्बी हंगामातील पीके जोमदार होतील अशी अपेक्षा आहे. रब्बीचा हंगाम जोरात असल्याचे दिसून येत आहे.अनेक भागात भौगोलिक रचणे नुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही, यंदा प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरू झाला आहे.गहू, हरभरा, कांदे हि प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीत देखील भाजीपाला, फळभाज्या घेण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. सोयाबीन, मक्याच्या वावरात भाजीपाला पिकवून चार पैसे मिळतील, खरीपात खर्च झालेले भांडवल वसूल होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असल्याने सर्व विसरून नवीन पिके घेण्यासाठी त्याने कंम्बर कसलीे आहे.सरासरी पेक्षा वाढदरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचा हंगाम जोरदार असणार आहे. इथून मागे अनेक भागात कमी पाऊस पडत असल्याने उन्हाळ्यात येणारी पिके घेतली जात नाही. पाऊस जोरदार झाल्याने खरीप हंगामा इतकीच रब्बीतील पिके असणार आहे. निसर्गाचा प्रकोप झाला नाही तर खरीप हंगामातील पिके जोरदार असतील, अशी शक्यता आहे. थंडीचा जोर वाढत असल्याने तो पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.- बी. जी. पाटील, कृषी अधिकारी, निफाड.अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीपाची वाट लागली. आता रब्बी हंगामातील पिके तरी जोरदार येऊ दे असे निसर्गाला साकडे घालत सर्व दु:ख मनात साठवत पुन्हा एकदा परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले आहे. नजरे समोर दिसणारी आव्हाने शेतकºयाला शांत बसू देत नाही.- किरण सुरवाडे, शेतकरी, पिंपळस.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक